Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधअध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच, आजच्या लोकप्रिय संस्कृतीत त्याच्याअसलेल्या विविध प्रतिमा, आपल्या नजरेसमोर उभ्या राहतात. दुर्दैवाने, त्यामुळेप्रचंड प्रमाणातगैरसमज निर्माण होतात. प्रामुख्याने अध्यात्म म्हणजे, शारिरीकमर्यादा पार करून आयुष्य अनुभवण्याची क्षमता.

मानवी स्वभावाचे स्वरूपच असे आहे, की त्याचा एक भाग ज्याची सहज प्रवृत्ती आत्मसंरक्षण आहे तो – सतत मर्यादा निर्माण करून त्यांचे संरक्षण करत राहतो. मनुष्याची अजून एक बाजू आहे ती, या क्षणी आहे तो जो आहे, त्यापेक्षा काहीतरी अधिक होण्याची इच्छा त्याच्यात सदैव कार्यरत असते. तुम्ही कोण आहात, किती मोठे आहात,तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही साध्य केलं असलं तरीही, त्याहूनही आणखी अधिक काही होण्याची इच्छा सदैव मनात असतेच.

- Advertisement -

याचा अर्थ असा आहे, की आपल्यात असं काहीतरी आहे, जिला मर्यादा आवडत नाहीत. आपल्यामध्ये असं काही तरी आहे, जे अमर्याद होण्यासाठी तळमळत आहे. ही तळमळ दूर करण्यासाठी, लोकांनी सर्व प्रकारची शांततावादी तत्वज्ञाने अंगिकारण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे. आपण लोभी बनू नये अशी शिकवण देऊन, सध्याच्या तुमच्या मर्यादांमध्येच कसे समाधानी राहायचे हे शिकवून,काहीतरी करून ती तळमळ थांबविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांनी तुम्हालाकोणतीही शिकवण दिलेली असली, तरीही आज तुम्ही आहात त्यापेक्षा अधिककाहीतरी बनण्याची तळमळ, या पृथ्वीतलावरील एकाही मनुष्याच्या मनातक्षमलेली नाही, कारण अमर्याद राहण्याची इच्छा अनंतकाळपासूनची आहे.

मनुष्याची ही तळमळ जेव्हा अगदी स्थूल रूपाने व्यक्त होते, तेव्हा आपण त्याला लैंगिकता म्हणतो. जर तिला भावनिक अभिव्यक्ती सापडली, तर आपण त्याला प्रेम म्हणतो. जर तिला मानसिक अभिव्यक्ती आढळली, तर सहसा समाजात त्याकडे लोभ, महत्वाकांक्षा, विजय वगैरे म्हणून बघितले जाते. फक्त जेंव्हा तिला एक जागृत अभिव्यक्ती गवसते, तेंव्हा ती एक आध्यात्मिक प्रक्रिया होते.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या