Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्याचित्ता आणि बिबट्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

चित्ता आणि बिबट्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

आज भारतातील ग्वाल्हेरमध्ये नामिबियातील 8 परदेशी चित्ते (Cheetah) दाखल झाले आहेत. श्योपूर येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त चित्त्यांचे भारतात आगमन झाले आहे. चित्ता आणि बिबट्या हे दोघेही दिसायला सारखेच दिसतात. या फरक काय आहे ते जाणून घ्या…

चित्ता आणि बिबट्याच्या कातड्यात फरक आहे. जिथे चित्ताची त्वचा हलकी पिवळी आणि पांढर्‍या रंगाची असते. तर बिबट्याची त्वचा पिवळ्या रंगाची असते. चित्ताच्या त्वचेवर गोल किंवा अंडाकृती काळे डाग असतात. त्यामुळे बिबट्याच्या त्वचेवरील डागांचा आकार निश्चित नसतो.

चित्ता बिबट्यांपेक्षा उंच दिसतात. त्यांचे खांदे हे बिबट्यांपेक्षा लांब असतात. चित्त्याचे सरासरी वजन 72 किलो असते. चित्ता जास्तीत जास्त 120 किमी प्रतितास वेगाने धावू शकतो.

इटलीत अनन्याचे ‘फूल टू एन्जॉय’, ग्लॅमरस फोटो चर्चेत

चित्ता आणि बिबट्याच्या पंजामध्येही फरक आहे. चित्त्याचे पंजे वेगाने धावण्यासाठी अनुकूल असतात. चित्त्याचे मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा मोठे आणि मजबूत असतात. त्यामुळे ते वेगाने धावू शकतात.

सचिन पिळगावकरांच्या लेकीचे बोल्ड फोटोशूट, चाहते घायाळ

चित्त्याचे पंजे आकुंचन पावत नाहीत, कारण त्यांना धावताना वेगाने हलवावे लागते. दुसरीकडे, बिबट्याचे पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा मोठे असतात. यामुळे, ते सहजपणे शिकार ओढून झाडावर नेतात. भक्ष्याला पंजा मारतानाही त्यांचे मोठे पाय उपयोगी पडतात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...