Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधकाय आहे प्रतिबालाजी मंदिराचा इतिहास ?

काय आहे प्रतिबालाजी मंदिराचा इतिहास ?

महाराष्ट्रातील पुणे येथील प्रतिबालाजी मंदिर हे श्री बालाजी यांना समर्पित आहे. जे भगवान विष्णुचे एक रूप आहे. तसेच आंध्रप्रदेशमधील एक लोकप्रिय देवता आहे. प्रतिबालाजी तिरुमाला तिरुपती मंदिर व्यंकटेश्वरशी जोडलेले आहे. ज्याचा संस्कृतमध्ये शाब्दिक अर्थ आहे ‘पापांचा नाश करणारा’. तसेच पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या भवानी पेठेत हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर कमीतकमी 200 मीटरपर्यंत पसरलेला आहे.

छोट्या गर्भगृहामध्ये मोकळ्या हवेमध्ये सभामंडप आहे. जिथे मंडळी जमा होतात. मंदिरातील मूर्ती ही बसलेल्या स्थितीमध्ये आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणामधून कोरलेली असून मूर्तीची उंची साधारण पाच फूट आहे. या मंदिरात जास्त करून पुण्यातील तेलगू समाजाचे लोक दर्शनासाठी येतात. व्यंकटेश्वर देवता यांच्याशी जोडलेल्या अनेक आख्यायिका आहे. यामधील एक आख्यायिका कुबेर यांच्याशी जोडलेली आहे.

जे हिंदू पौराणिक कथांमधील एक देव-राजा आहे. ज्यांना धनाची देवता म्हणून पूजले जाते. आख्यायिकेनुसार भगवान कुबेरांनी एक अट ठेवली होती की, वेंकटेश्वर आपले ऋण फेडल्याशिवाय वैकुंठात जाऊ शकणार नाही. याप्रकारे व्यंकटेश्वर आंध्र प्रदेशमधील तिरुमलामध्ये राहतात व ऋण फेडल्यानंतरच वैकुंठात जाऊ शकतील. श्री बालाजी मंदिर ट्रस्ट ही मंदिराची प्रशासकीय संस्था आहे. तसेच 2014 मध्ये मंदिराचा विकास आणि जीर्णोद्धार झाला. ट्रस्ट मंदिरात येणार्‍या भाविकांना निवास, परवडणार्‍या दरात जेवण, अल्पोपहार आणि रेल्वे आरक्षण अशा विविध सुविधा पुरवते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...