वास्तुशास्त्रात एखादी गोष्टी कशा आणि केव्हा कराव्यात याची पद्धत सविस्तरपणे सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रात आणि वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये नेहमीच घर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय घरामध्ये वस्तू योग्य दिशेला ठेवल्या नाहीत तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तूनुसार झाडू घरात न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तुशास्त्रानुसार झाडू कोणत्या दिशेला ठेवावेत. वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या घरात, स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये झाडू ठेवू नये. घराच्या उत्तर-पश्चिम किंवा पश्चिम दिशेला झाडू ठेवा. झाडू ईशान्य किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवू नये.
झाडू सर्वांच्या नजरेपासून दूर ठेवा – झाडू घरात सहज दृष्टीस पडणार नाही असा ठेवा. झाडू कधीही उभा किंवा उलटा ठेवू नका. झाडू नेहमी पाडून ठेवला पाहिजे. जुना किंवा तुटलेला झाडू कधीही वापरू नका, जुना झाडू शनिवारी बदलावा. असं केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. बेडरुममध्ये झाडू कधीही ठेवू नका कारण याने घरात तणाव निर्माण होतो. पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडणं होऊ शकतं.
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा – संध्याकाळी कधीही घरात झाडू मारू नका आणि तुमचा वापरलेला झाडू कोणालाही देऊ नका. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो.
जुना झाडू कधी फेकावा – घरामध्ये जुने आणि तुटलेले झाडू वापरू नये असे मानले जाते. जुना झाडू शनिवार, अमावस्या किंवा होलिका दहनाच्या दिवशी बाहेर काढावा. जुने झाडू घराबाहेर काढल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.
घरात झाडू ठेवण्याची योग्य जागा कोणती ?
ताज्या बातम्या
Nashik Crime News : रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या कामगारांचे बंदुकीच्या धाकावर...
ओझे | वार्ताहर | Oze
तळेगाव शिवारात (Talegaon Area) 'डी. जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बंदूकधारी गुंडांनी दहशत माजवत...




