Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधदेवळामागील विज्ञान काय आहे ?

देवळामागील विज्ञान काय आहे ?

देवळांची निर्मीती अशाच ठिकाणी केलेली असते जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात उत्सर्जित करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधिपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई. आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान आहे कसे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धुऊन मगच मंदिरात प्रवेश करावा – ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील पवित्र सकारात्मक उर्जा दूषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्य भागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शुभ ऊर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पांइट्स मधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल. जर तुमची पंच ज्ञानेंद्रिये रिसीविंग मोड मध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल.

2) गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवणे – ह्यामागेही दोन उद्देश आहेत: पहिला म्हणजे, ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद राहणारा प्रतिध्वनीत नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पाच सेन्सेस म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वास घेणे. यापुढील रुढी हे पाच सेन्सेस उद्दीपित करतात: -कापूर जाळणे: दृष्टी. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावणे: स्पर्श. मूर्तीवर फुले वाहणे: फुलांच्या अरोमामुळे वास. कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे..चव. हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.

घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे- अशा प्रकारे उद्दीपित अवस्थेत व रिसीविंग मोड मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते. मूर्तीच्या मागील बाजूस व भवतालात पसरलेली उर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...