Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधघरात कोणत्या प्रकारचे शो पीस ठरतात लाभदायक ?

घरात कोणत्या प्रकारचे शो पीस ठरतात लाभदायक ?

घरात सकारात्मकता राहवी म्हणून आपण सतत नवीन प्रयत्न करत असतो. चीनी वास्तू फेंगशुई देखील सकारात्मकतेसाठी लाभदायक मानली जाते. फेंगशुईमध्ये अशा अनेक वस्तू आहेत. ज्यांना घरात ठेवल्याने व्यक्तीच्या सुख, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो. आज आपण फेंगशुईच्या अशा शोपीसबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे घरात कायम आनंदाचं वातावरण राहातं. त्यांना घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोषही दूर होऊ शकतात.

वास्तुच्या अशाच शोपीसबद्दल जाणून घेऊया.

फेंगशुई मांजर- फेंगुशाई मांजर घरात ठेवणं शुभ मानले जात. हिंदू धर्मात, मांजरीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. घर किंवा ऑफिसमध्ये फेंगशुई कॅट ठेवल्याने व्यक्तीचे भाग्य जागृत होते. फेंगशुई मांजरीचे अनेक प्रकार आहेत. अनेक रंगांच्या मांजरी बाजारात उपलब्ध आहेत. पण सोनेरी रंगाची मांजर पैसा मिळविण्यासाठी लाभदायक मानली जाते. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला हिरवी फेंगशुई मांजर ठेवल्यास लाभ होण्यास सुरूवात होते.

मेटल टर्टल- फेंगशुईमध्ये मेटल टर्टलला देखील खूप शुभ मानलं जातं. सकारात्मकता आणण्यासाठी ते घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास लाभ होतो. उत्तर दिशेला मेटल टर्टल ठेवल्यास लाभ होईल. त्याचबरोबर व्यक्तीच्या आर्थिक समस्याही दूर होतात. जास्तीत जास्त फायद्यासाठी ते पाण्याखाली ठेवणे चांगले.

फेंगशुई उंट- चिनी वास्तूच्या फेंगशुईमध्ये उंटाचेही विशेष महत्त्व आहे. हे संघर्षाचे प्रतीक मानले जाते. घरात ठेवल्याने धनलाभ होतो. पैशाची कमतरता भासत नाही. तसेच कर्जातून मुक्ती मिळते. त्याचबरोबर उत्पन्नाचे स्रोत वाढतात आणि घरातील नकारात्मकता दूर होते. फेंगशुई उंट उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्यास लाभ होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...