Wednesday, March 26, 2025
Homeदेश विदेशLoksabha Election 2024 : सातव्या टप्प्यात दुपारी एक वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती...

Loksabha Election 2024 : सातव्या टप्प्यात दुपारी एक वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?

आकडेवारी आली समोर

नवी दिल्ली | New Delhi

देशभरातील विविध राज्यांत गेल्या दीड महिन्यापासून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान (Polling) प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यात (Seven Phase) मतदान होत आहे. त्यामध्ये बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या राज्यांचा समावेश असून सातव्या टप्प्यात लोकसभेच्या (Loksabha) एकूण ५७ जागांसाठी मतदान होत आहे. अशातच आता दुपारी एक वाजेपर्यंत या मतदारसंघांमध्ये किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik-Dindori Constituency 2024 : मतदान टक्का वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता शिगेला

या आकडेवारीनुसार दुपारी १ वाजेपर्यंत बिहार ३५.६५ टक्के, चंदीगड ४०.१४ टक्के, हिमाचल प्रदेश ४८.६३ टक्के, झारखंड ४६.८० टक्के, ओडिशा ३७.६४ टक्के, पंजाब ३७.८० टक्के, उत्तर प्रदेश ३९.३१ टक्के, पश्चिम बंगाल ४५.०७ टक्के इतके मतदान झाले आहे. तर सकाळी नऊ वाजेपर्यंत देशात ११. ३१ टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११ आणि दुपारी एक वाजेपर्यंत ही आकडेवारी वाढल्याचे दिसून आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...