Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनकंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवार म्हणाले...

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवार म्हणाले…

मुंबई | Mumbai –

मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेकडून कंगनाच्या कार्यालयात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर

- Advertisement -

हातोडा चालवण्यात आला. भाजपा नेते राम कदम, प्रवीण दरेकर यांनी सूड भावनेने कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कंगनाच्या वक्तव्याला फार महत्व देऊ नये असे मतही त्यांनी व्यक्त केले. शरद पवारांनी म्हटलं आहे की, कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकार्‍यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल.

दरम्यान कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, मला असं वाटतं अशी वक्तव्यं करणार्‍यांना आपण अधिक महत्व देत आहोत. असं वक्तव्य केल्याने जनमनासावर काय परिणाम होईल हे पहावं लागेल, पण माझ्या मते कोणी गांभीर्यानं घेत नाही. महाराष्ट्र, मुंबईच्या लोकांना या शहरातील, राज्यातील पोलिसांचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचं कतृत्त्व त्यांनी माहिती आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना वैगेरे केली तर गांभीर्याने लक्ष देऊ नये.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या