Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्याNcp Crisis : अजित पवार गट आणि शरद पवारांमधील भेटीत कुठल्या विषयावर...

Ncp Crisis : अजित पवार गट आणि शरद पवारांमधील भेटीत कुठल्या विषयावर चर्चा झाली? समोर आली ‘ही’ मोठी माहिती

मुंबई | Mumbai

काल अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या गटाच्या नऊ मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर भेट घेतली होती. त्यावेळी या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहण्यासाठी शरद पवारांना आपल्यासोबत सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केल्याचे सांगितले जात आहे. पंरतु,शरद पवार यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे बोलले जात आहे…

- Advertisement -

Ncp Crisis : अजित पवार गटाने पुन्हा का घेतली पवारांची भेट?; पटेलांनी सांगितले खरे कारण!

त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गटातील काही आमदारांनी (MLA) यशवंतराव चव्हाण सेंटरवर पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधतांना काल काही आमदारांना शरद पवार यांचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आज घेऊन आलो, असे सांगितले. अशातच आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली आहे.

Trimbakeshwar News : दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून; शोधमोहीम सुरू

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात गळ घालण्यात आल्याचे समजते. तसेच आमचे नेते आजही तुम्हीच आहात, तुम्ही आम्हाला समजून घ्या, ही सर्व आमदारांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासंदर्भात अजित पवार गटाने आज पुन्हा एकदा शरद पवारांना विनंती केल्याचे बोलले जात आहे.

Nashik News : मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळली; दोघे गंभीर जखमी

दरम्यान, अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) काल आणि आज शरद पवारांची लागोपाठ दोन दिवस भेट घेतल्यानंतरही शरद पवारांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शरद पवार या दोन्ही भेटींबाबत नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघणे देखील महत्वाचे असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Trimbakeshwar News : सोमवती अमावस्यानिमित्त त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने फुलली

- Advertisment -

ताज्या बातम्या