हिंदू धर्मात पूजेच्या वेळी आरतीला विशेष महत्त्व आहे. आरती केल्याशिवाय पूजा पूर्ण संपन्न होतं नाही. आरती झाल्यानंतर ताटावरून हात का फिरवला जातो? तर भक्त दिव्यावरुन हाथ फिरवून तो हात डोळ्यांना लावतात किंवा डोक्यावरुन फिरवतात. परंतु असं का केलं जाते तुम्हाला माहितीय?
- आरती करण्याची योग्य पद्धत कोणती ? – सर्वात पहिलं तर आपण हे जाणून घेऊया की आरती करण्याची योग्य पद्धत कोणती. खरंतर भगवंताची आरती करताना, दिवा फिरवण्याच्या संख्येची आणि पद्धतीची विशेष काळजी घेतली जाते.
आरतीची सुरुवात नेहमी देवाच्या चरणांनी करावी, हे सर्वसामान्यांना माहित नसतं. चार वेळा आरती सरळ दिशेने फिरवावी आणि त्यानंतर 2 वेळा देवाच्या नाभीची आरती करावी. यानंतर देवाच्या मुखाची आरती 7 वेळा करावी.
भगवंताची आरती झाल्यानंतर भाविक दोन्ही हातांनी आरती घेतात. या दरम्यान 2 भाव आहेत, पहिलं म्हणजे, ज्या दिव्याच्या ज्योतीने आम्हाला आमच्या आराध्याचे नखशिखांत इतकं सुंदर दर्शन दिलं आहे, ते आम्ही त्याचा आशिर्वाद आमच्या डोक्यावर ठेवतो आणि दुसरा भाव म्हणजे, देवासाठी ज्या दिव्याची वातीने देवाची सेवा केली आहे किंवा देवाला खुश केले आहे त्या आरतीची ज्योत कपाळावर धरावी किंवा ती आरती डोक्याला लावावी. - आरती करताना या गोष्टी लक्षात ठेवा- आरती करताना तुम्ही जे काही शब्दोच्चार करता तो बरोबर असावा, असा प्रयत्न केला पाहिजे. तसंच आरतीच्या वेळी इतर कोणत्याही विषयाचा विचार डोक्यात आणू नये.