Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडादशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला विराट, पाहा व्हिडिओ

दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला विराट, पाहा व्हिडिओ

दिल्ली l Delhi

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे) पुरस्कारावर ठसा उमटवला आहे. दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू असे मानाचे पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत.

- Advertisement -

पुरस्कार मिळाल्यानंतर विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या दशकातील महत्त्वाच्या घटनांबाबत बोलताना त्याने २०११ मधील वनडे विश्वचषक, २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१८ साली ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजय यांचा उल्लेख केला. या दशकातील आपल्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणाला, “भारतासाठी खेळणे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मिळालेला हा पुरस्कार असल्याने मी ते भाग्य समजतो. सातत्याबाबत बोलायचे झाल्यास तुम्ही एकट्याने काहीही साध्य करू शकत नाही. तुम्हाला संघ म्हणून एकजुट असणे गरजेचे असते. आम्ही मागील दशकात तेच करायचा प्रयत्न केला. विजय असो किंवा पराभव, संघ म्हणून एकत्र राहण्यावर आम्ही भर दिला. माझ्या फलंदाजीतील सातत्य मला नक्कीच इथून पुढे कायम ठेवायला आवडेल आणि भारताला अधिकाधिक सामने जिंकवून देण्याची माझे लक्ष्य असेल. कारण माझ्यासाठी संघाचा विजय, हेच प्रमुख ध्येय आहे.”

विराटने दशकातील सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटूची पुरस्कारही पटकावला. त्यावर प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला, “वनडे सामन्यात मी माझे पदार्पण कसोटीआधी झाले होते. त्यामुळे मला या फॉरमॅटला समजून घ्यायला मदत झाली. वनडे सामन्यांतील माझे आकडे नक्कीच सुखावह आहेत, पण संघाला विजय मिळवून देणे हेच माझे मुख्य लक्ष्य असते. तुम्ही चांगला खेळ करून संघाला विजय मिळवून दिला, तर आकडे आणि विक्रम आपोआप तुमच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे मी त्याकडे फार लक्ष देत नाही. माझ्यासाठी या दशकातील खास असलेल्या खेळींचा उल्लेख करायचा झाला तर पाकिस्तानविरुद्ध आशिया कप स्पर्धेतील १८३ धावांची खेळी, तसेच २०११च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील ३५ धावांची खेळी, यांची नाव मी घेईल. शिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०१३ सालच्या भारतातील मालिकेतील दोन शतके सुद्धा माझ्या हृदयाच्या जवळ आहेत.”

विराट कोहलीनं २०१० ते २०२० या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडूलकरचा १२ हजार धावांचा विक्रम मोडीत काढला. गेल्या दशकात ३९ शतकं, ४८ अर्धशतकं आणि ११२ झेल घेणारा कोहली एकमेव फलंदाज आहे. कोहलीनं दशकात १० हजारपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. त्यामुळेच विराट कोहलीची दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा सर गॅरी सोबर्स पुरस्कारासाठीही विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे.

2020 वर्षासाठी आयसीसीचे पुरस्कार:

सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, (दशकातील सर्वोत्तम खेळाडू) विराट कोहली – (भारत)

दशकातील सर्वोत्तम महिला खेळाडू: एलिस पेरी – (ऑस्ट्रेलिया)

दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू: स्टिव्ह स्मिथ – (ऑस्ट्रेलिया)

दशकातील सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटर: विराट कोहली – (भारत)

दशकातील सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटर: एलिस पेरी – (ऑस्ट्रेलिया)

दशकातील सर्वोत्तम टी-20 पुरुष खेळाडू: राशिद खान – (अफगाणिस्तान)

खेळाडूवृत्ती पुरस्कार (स्पिरिट ऑफ क्रिकेट): एमएस धोनी – (भारत)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या