Monday, May 27, 2024
Homeभविष्यवेधघरात कोणते लाकूड ठेवू नये

घरात कोणते लाकूड ठेवू नये

बरेचदा लोक घर सजवण्यासाठी लाकडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करतात. तुम्हाला माहीत आहे का, अनेकवेळा या वस्तू ज्या लाकडापासून बनवल्या जातात ते तुमच्या संपत्तीसाठी, आरोग्यासाठी चांगले नसते?

लोक त्यांचे घर सजवण्यासाठी विविध प्रकारच्या लाकडी वस्तूंचा वापर करत असले तरी ते नेहमीच फायदेशीर नसते. वास्तुशास्त्रानुसार काही विशेष प्रकारचे लाकूड घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही अशी कोणतीही वस्तू विकत घ्याल तेव्हा सर्वप्रथम ती बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचे लाकूड वापरण्यात आले आहे ते पहा.

- Advertisement -

चिक येणार्‍या झाडाचे लाकूड – अशी झाडे तुम्ही अनेक ठिकाणी पाहिली असतील, जेव्हा फांद्या किंवा पाने तोडली जातात तेव्हा त्यातून पांढरा रंगाचा चिकट पदार्थ बाहेर पडतो. वास्तुशास्त्रानुसार अशा झाडाचे लाकूड किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू कधीही घरात ठेवू नयेत. त्यांचे लाकूड किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू चुकूनही घरी आणू नका.

स्मशानभूमीत वाढणारी झाडे- स्मशानभूमीचे लाकूड सजावटीच्या वस्तू, मूर्ती किंवा फ्रेम बनवण्यासाठी वापरण्यात आले असेल तर ते घरी आणू नका. या प्रकारच्या लाकडामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. यामुळे तुमच्या घराची आर्थिक सुबत्ता उद्ध्वस्त होऊ शकते. स्मशानभूमीत वाढणार्‍या झाडाचे लाकूडही घरात जाळू नये. पण अनेकदा असं होता की स्मशानभूमीत हे झाड वाढले आहे की नाही? हे कसं ओळखता येईल? फर्निचर घरात आल्यानंतर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल स्पेशली घरातल्या स्त्रियांना तर त्वरित असे फर्निचर घराच्या बाहेर करा. यासाठी वास्तू एक्सपर्ट ची सुद्धा मदत होऊ शकतात.

कमकुवत आणि सुकलेली झाडे- जर एखाद्या कमकुवत किंवा कोरड्या झाडाचे लाकूड कोणत्याही वस्तू किंवा मूर्ती बनवण्यासाठी वापरले गेले असेल तर ते घरी आणू नका. विशेषत: दीमक किंवा मुंग्यांनी पोकळ केलेल्या झाडांचे लाकूड वापरू नका

काही वेळेला फर्निचर करण्यासाठी ओस जागेतील झाडं वापरण्यात येतात पण त्या जागेमध्ये रक्तपात झाला असेल किंवा ती जागा वंश खंडलेल्या व्यक्तीची असेल किंवा त्या जागेमध्ये झाडाखाली कोणाचा मृत्यू झाला असल्यास , आशा प्रकारचे फर्निचर आपल्या घरामध्ये आल्यास घरात निगेटिव्हिटी आणू शकते. असे शास्त्रात सांगितले गेले आहे.

अनेक झाडे नकारात्मक उर्जेने भरलेली असतात. या झाडांचे लाकूड फर्निचर बनवण्यासाठी वापरल्याने घरातील आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे नेहमी सागवान , शिसंम गुलाबाचे लाकूड, चंदन, अशोक,अर्जुन किंवा कडुलिंब इत्यादी सकारात्मक वृक्षांचे लाकूड फर्निचर करण्यासाठी वापरावे. त्यांचा वापर करणे शुभ आहे आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

शनिवार किंवा अमावस्येला लाकडापासून बनवलेले फर्निचर खरेदी करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे फर्निचर किंवा लाकडी वस्तू खरेदी करण्याचा विचार नेहमी शुभ दिवशीच करावा.

दिशाचे ज्ञान – जड फर्निचर नेहमी पश्चिम दिशेला ठेवावे आणि हलके सामान उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. या प्रकरणात, निष्काळजीपणामुळे किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष केल्यामुळे, पैशाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

घरामध्ये लाकडी फर्निचर बनवताना काम दक्षिण किंवा पश्चिम दिशेपासून सुरू करून ईशान्य दिशेला पूर्ण करावे. ही पद्धत वापरल्याने कुटुंबाच्या प्रगतीत बाधा येत नाही.

लाकडी वस्तू बनवण्यासाठी खरेदी केलेले लाकूड ईशान्य दिशेला साठून ठेवणे टाळावे. यामुळे कामात विलंब होईल तसेच धनहानीही होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या