Thursday, January 29, 2026
Homeदेश विदेशPM Narendra Modi: "मोठी किंमत मोजावी लागेल आणि ते त्यासाठी तयार"; मोदींचे...

PM Narendra Modi: “मोठी किंमत मोजावी लागेल आणि ते त्यासाठी तयार”; मोदींचे टॅरिफ वॉरवर ट्रम्प यांना थेट उत्तर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपली धमकी खरी करून दाखवली आहे. भारतावर अतिरिक्त २५% कर लादण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ही करवाढ २१ दिवसांनंतर म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होईल. यावरुनच भारतावर आर्थिक दबाव आणण्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण तयारी केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे, असे पंतप्रधान मोदींनी ठणकावले आहे.

डोनाल्‍ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार असल्याचे पीएम मोदी यांनी गुरुवारी म्हटले. त्यांनी आज दिल्लीतील एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत संबोधित केले.

- Advertisement -

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
टॅरिफ वॉर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या बाजूने एक मोठे विधान केले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि ते त्यासाठी तयार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

YouTube video player

मोदी पुढे म्हणाले, “सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी सतत काम करत आहे. आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी तडजोड करणार नाही आणि मला माहित आहे की मला वैयक्तिकरित्या यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल. पण मी त्यासाठी तयार आहे. आज भारत माझ्या देशातील शेतकऱ्यांसाठी, माझ्या देशातील मच्छीमारांसाठी, माझ्या देशातील पशुपालकांसाठी तयार आहे,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याच्या उद्दिष्टांवर आम्ही सतत काम करत आहोत. सरकारने शेतकरी ताकदीला देशाच्या प्रगतीचा एक आधार मानले आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत जी धोरणे तयार करण्यात आली ती केवळ मदत नव्हती, तर शेतकऱ्यांचा विश्वास वाढवण्याचा आमचा प्रयत्न होता. पीएम किसान सन्मान निधीद्वारे मिळत असलेल्या थेट मदतीमुळे छोट्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पीएम पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना जोखमींपासून सुरक्षा प्रदान केली आहे. पीएम कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाशी संबंधित समस्या सोडवल्या आहेत. १० हजार एफपीओच्या निर्मितीमुळे छोट्या शेतकऱ्यांची संघटित शक्ती वाढली आहे. सहकारी आणि बचत गटांना आर्थिक मदत मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळाली आहे. ई-नाममुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेत उत्पादनाची विक्री करणे सोपे झाले आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

भारताचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर
भारत सरकारने रशियाचेच उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले होते. ज्या रशियाचे नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावले आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारताने दिला आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रे रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहेत. पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उपलब्ध पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आले. त्यामुळेच भारताने रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...