Wednesday, October 16, 2024
HomeUncategorizedकसे असेल WhatsApp चे ‘Expiring Media’ फीचर?

कसे असेल WhatsApp चे ‘Expiring Media’ फीचर?

अँड्रॉइड साठी व्हॉट्सअँपची २.२०.२०१.६ बीटा या नव्या फीचरची झलक बघावयास मिळणार आहे. यास एक्सपायरिंग डाटा असे म्हटले जात आहे. याद्वारे युजर्सला पाठविलेल्या मिडिया फाईल्स एकदा युजरने पाहिल्यानंतर अपोआप या फाईल्स गायब होणार आहेत…

यामध्ये इमेजेस, व्हिडीओ आणि जीआयएफ फाईल्सचा समावेश आहे. व्हॉट्सअँप फिचर ट्रेकर डब्ल्यू ए बीटा इन्फॉर्मेशन च्या द्वारे 2.20.201.6 बीटा ने सादर केलेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

इस्टेंट मैसेजिंग अँप मॅसेज प्राप्त करणाऱ्या युजर्सला पॉप-अप मॅसेज द्वारे एक्सपायरिंग मीडिया फीचर ची माहिती देणार आहे. “This media will disappear once you leave this chat” ( ही मीडिया फाईल चॅट सोडताच गायब होणार आहे)

यासोबतच व्हॉट्सअँप मॅसेजिंग फिचर सोबतच नवे काही फीचर्स येण्याची शक्यता आहे.

इंस्टाग्रामच्या धर्तीवरच व्हॉट्सअँप एक्स्पायरिंग मीडिया फिचर काम करणार आहे. इंस्टाग्राममध्ये एकदा युजर ने काही संदेश पाठविल्यानंतर काही वेळाने हा संदेश, इमेज किंवा फोटो आणि व्हिडीओ आपोआप गायब होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या