Saturday, May 17, 2025
Homeक्राईमव्हिल रिम व टायरसह चार लाखांच्या ऐवज लांबविला

व्हिल रिम व टायरसह चार लाखांच्या ऐवज लांबविला

केडगावातील घटना || कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

अ‍ॅटोबन ट्रकिंग कॉर्पोरेशन (भारत बेंच अथोराईझ डिलर) प्रा.लि. कंपनीच्या केडगाव शाखेतून चोरट्यांनी तीन लाख 20 हजार रुपये किंमतीचे आठ ट्युबलेस टायर व 80 हजाराचे आठ व्हिल रिम बोल्ट असा चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. रविवारी (22 डिसेंबर) सायंकाळी सात ते सोमवारी (23 डिसेंबर) सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे मॅनेजर सागर हनुमंत मोरे (वय 31 रा. विश्वयनराजेनगर, केडगाव, मुळ रा. रांधे ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.

अ‍ॅटोबन ट्रेकिंग कॉर्पोरेशन प्रा.लि. कंपनीच्या केडगाव शाखेतून भारत बेंझ कंपनीमधील निर्माण होणार्‍या वाहनांची विक्री आणि सर्व्हिसचे काम केले जाते. या कंपनीत कामानिमित्त भारत बेंझ कंपनीचे बारा चाकी वाहन लावलेले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी कंपनीतील कर्मचार्‍याला त्या वाहनाचे टायर व व्हिल रिम बोल्ट दिसून आले नाही. त्यांनी याची माहिती मॅनेजर मोरे यांना दिली. त्यांनी पाहणी केली असता टायर व व्हिल रिम बोल्ट दिसून आल्या नाहीत. सदर वाहनाचे आठ टायर व आठ व्हिल रिम बोल्ट खोलून नेल्याचे मोरे यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राहुल शिंदे करत आहेत.

45 हजारांची रोकड लंपास
नवीपेठेतील जैन बँगल स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून 45 हजार रूपयांची रोकड लंपास केली. शनिवारी (21 डिसेंबर) रात्री पावणे बारा ते रविवारी (22 डिसेंबर) सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सोमवारी (23 डिसेंबर) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौशल विजयकुमार पांडे (वय 53 रा. देशमुख गल्ली, चौपाटी कारंजा, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस अंमलदार आर. ए. दरंदले करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

छगन

Chhagan Bhujbal: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या तोतया...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे माजी पालकमंत्री आणि माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री आमदार छगन भुजबळ यांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून छगन भुजबळ यांचे स्विय सहाय्यक...