धुळे ।dhule । प्रतिनिधी
सोशल मिडीया, वृत्तपत्रे आणि बँकाकडूनही आपल्या बँक खाते, एटीएम कार्डची डिटेल्स कोणालाही देवू नये, असे वारंवार सांगून, जनजागृती करून देखील लोक त्यास बळी पडत आहेत. शिरपूरातील शिक्षकाला (teacher) लिंकव्दारे (Link) प्रोसेस करण्यास सांगून त्यांच्या खात्यातून (account) परस्पर पावणे पाच लाख ट्रान्सफर (Transfer five lakhs) करून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात इसमावर शिरपूर शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…तीनशे रूपयांची लाच ‘मनिषा’ला घेवून गेली गजाआड Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप
याबाबत संजय भिकनराव पाटील (वय 51 रा. 38 अ, श्री पदमावती नगर, मुकेश टाऊन हॉलसमोर, शिरपूर) या शिक्षकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्यांना दि. 20 जानेवारी रोजी एका मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर डीअर कन्स्टमर युवाँर युनो एसबीआय अकाऊंट विल व्ही ब्लॉकेड, प्लीज अपडेट युवाँर पॅनकार्ड अॅण्ड कम्प्लीट युवाँर केवायसी क्लिक हीअर… अशी लिंक असलेला एसबीआय टीम असा मॅसेच आला.
त्याव्दारे प्रोसेस करण्यास सांगुन त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शिरपूर येथील मुख्य शाखेतील खात्यातून अज्ञात इसमाने वेळोवेळी एकुण 4 लाख 87 हजार 347 रूपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिष गोराडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नंदुरबार रेल्वे स्टेशनवर गदारोळात धावली माणुसकीची खाकी एक्सप्रेस हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !