Monday, June 17, 2024
HomeUncategorizedद्वारका चौक वाहतूक कोंडीमुक्त कधी?

द्वारका चौक वाहतूक कोंडीमुक्त कधी?

नाशिक | फारुख पठाण | Nashik

- Advertisement -

नाशिक शहराचे (nashik city) प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या (Traffic congestion problem) सुटावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मागील कित्येक वर्षापासून हा प्रश्न तसच पडून आहे.

या ठिकाणी महापालिकेने विशेष अतिक्रमण मोहीम (Special Encroachment Campaign) घ्यावी, त्याचप्रमाणे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी (Traffic congestion) कमी होऊन देशभरातून येणार्या भाविकांना पवित्र गंगाघाटावर जाण्यासाठी सुविधा व्हावी, या उद्देशाने द्वारका चौकात भुयारी मार्ग (Subway) तयार करण्यात आले आहे. मात्र त्याचा उपयोगच होत नसल्याने त्यातून दुचाकी जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

द्वारका येथील भुयारी मार्ग (Subway) भले मोठे असून त्यात मनपा प्रशासनाने सिबीएस (CBS) प्रमाणे भुयारी मार्गात पालिका बाजार म्हणजे गाळे तयार केल्यास बेरोजगारांना देखील रोजगार उपलब्ध होऊन मनपाला महसुल मिळेल. नाशिक शहराचे प्रवेशद्वार म्हणून जगभर प्रसिध्द द्वारका चौफूलीवरील नियमीत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक वेळा योजना तयार करण्यात आल्या आहेत, मात्र यातील एकही योजना सफल झालेल्याचे दिसते. लहान मोठे सुमारे 16 मार्ग याठिकाणाहून जातात. मात्र त्यांचे नियोजन नसल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत या मुख्य चौकात वाहतूक कोंडी (traffic jam) कायम असते.

सायंकाळी तर अर्धाअर्धा तास वाहनचालकांना चौक क्रॉस करण्यासाठी वेळ जातो.मागील अनेकवर्षांपासून द्वारका चौकाचा श्वास वाहतुकीच्या कोंडीत अडकला असून, हा चौक कधी मोकळा श्वास घेणार असा प्रश्न कायम आहे. विविध प्रयोग, नियोजन, बदल करूनही तेथील कोंडी सुटलेली नाही. चौकातील अतिक्रमण (Encroachment), बेशिस्त वाहतुकीला आळा बसत नसल्याने कोंडीत दिवसाकाठी वाढ होत आहे. पोलिस (police), महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे

सारडा सर्कल, मुंबई नाका, नाशिकरोड, पंचवटी, आडगाव या सर्व भागातून येणारे एकूण नऊ रस्ते द्वारका चौकात मिळतात. रात्रीची वेळ सोडली तर दिवसभर याठिकाणी कायम वाहतूक कोंडी (traffic jam) आहे. विशेष म्हणजे चौकातील सिग्नल यंत्रणा नियमीत सुरू राहत नसल्याने कोंडीच्या समस्येत आणखी भर पडते. तर चौकात वाहतूक पोलिसांची (Traffic Police) संख्या देखील सध्या अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. या चौकात सर्व बाजूंनी येणार्या वाहनांची संख्या जास्त असून नाशिकरोड, मुख्य शहरात व उपनगरात जाणारी मोठी वाहने नाशिक-मुंबई उड्डाणपुलावरून (Nashik-Mumbai flyover) द्वारका चौकात उतरत असल्याने देखील कोंडी होते.

गत दोन वर्षांत येथील कोंडी टाळण्यासाठी अनधिकृत धार्मिक स्थळ (Unauthorized religious place) हटविण्यात आले. पोलिसांनी यू-टर्नचा प्रयोग राबविला. अतिक्रमण कारवाई झाली. रिक्षा व खासगी वाहनचालकांना तंबी देण्यात आली. मात्र पुन्हा परिस्थिती ’जैसे थे’ आहे. शहराच्या मुख्य चौकातच कोंडीचा बोजवारा उडाल्याने तसेच, वारंवार याविरोधात भूमिका घेऊनही प्रशासनातर्फे ठोस पावले उचलली जात नसल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहे. मात्र त्याचा उपयोगच होत नसल्याने ते बांधून काय साध्य झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या भुयारी मार्गात जाण्या-येण्यासाठी चार ठिकाणी मार्ग देण्यात आले आहे. एक द्वारका हॉटेल जवळ आहे, तर एक द्वारका पोलीस जवळ तर एक बागवानपुर्याकडे जाणार्या रसत्याच्या कोपर्यात व एक नाशिकरोडहून येणार्या पखालरोडच्या कोपर्यावर द्वार तयार करण्यात आलेले आहे. मात्र मार्गचा उपयोग होत नसल्याने हे मार्ग देखील आता त्रासदायक ठरत आहे. म्हणून भुयारी मार्गातून दुचाकीसाठी मार्ग तयार करण्यात यावा व जर हे श्नय नसेल तर कमीत कमी भुयारी मार्गचे द्वार तरी सपाट करण्यात यावे, यामुळे तरी वाहन जाण्यासाठी जागा वाढेल व कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी नागरीक करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या