Wednesday, March 26, 2025
Homeनंदुरबारमला शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे!

मला शबरी घरकुल योजनेची माहिती हवी आहे!

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

मुंबई (mumbai) मंत्रालयातील (ministry) आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) हे आपल्याच विभागाने सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाईन नंबर स्वतःच डायल करतात. आपण कोण बोलतोय हे न सांगता शबरी घरकुल योजनेबाबत माहिती हवी आहे. याची माहिती मिळेल का? असे बोलून हेल्पलाइनवर बसलेल्या आपल्याच एका कर्मचार्‍याची परीक्षा घेतात. तर समोरूनच अत्यंत नम्रपणे आणि विनयशील स्वरात आपण कोण बोलत आहात, अन कुठून बोलत आहात, असे विचारून ठक्कर बाप्पा घरकुल योजनेची अत्यंत आत्मविश्वासाने आणि सविस्तरपणे माहिती देणारी ती महिला कर्मचारी मंत्र्यांनी अनाहूतपणे घेतलेल्या परीक्षेत पास झाल्या.

- Advertisement -

मंत्रालयातून एक फोन कॉल सेंटरला लावला जातो. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित स्वतः नंबर फिरवतात आणि विचारणा करतात की आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या शबरी घरकुल योजनेची माहिती देता येईल का?

पलीकडून एक महिला कर्मचारी नम्र आणि आश्वासक स्वरात विचारणा करते की कोण बोलत आहे? पत्ता काय? अर्थातच आदिवासी मंत्री आपले नाव न सांगता, एका स्वीय सहाय्यकाचे नाव आणि पत्ता सांगतात. योजनेची सारी माहिती पलिकडून पटापट दिली जाते.

मंत्री डॉ.गावित यांनीच काही दिवसापूर्वी या हेल्पलाईनचे उद्गाटन नाशिक येथे कार्यक्रमात केले होते. पण तो क्रमांक खरोखर कसा चालतो याची माहिती त्यांना प्रत्यक्ष घ्यायची होती.

इथे प्रत्यक्षात योग्य माहिती देणारी ऑपरेटर महिला कर्मचारी माहिती द्यायला सुरुवात करते. आपण कोणाशी बोलत आहोत याची पुसटशीही कल्पना हेल्पलाइनवर माहिती देणार्‍या संबंधित कर्मचार्‍याला नव्हती. हा अनुभव म्हणजे मंत्री डॉ. विजयकुमार गावीत तसेच मंत्री दालनात बसलेल्या अधिकार्‍यांना, अभ्यागतांना सुखद धक्का असतो.

१८००२६७०००७ हा आदिवासी विकास विभागाच्या हेल्पलाईनचा नंबर नव्याने सुरू केला आहे. या हेल्पलाइनचा कंट्रोल रूम नाशिक आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक येथे राहणार आहे. आदिवासी विभागाच्या योजना आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे याची सविस्तर माहिती या क्रमांकावर मिळते.

– संकलन – रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...