Saturday, July 27, 2024
Homeनाशिककेंद्रीय मंत्री असतांना मतदारसंघात गरोदर मातांना जीव गमवावा लागतो कसा? -आ.रोहित पवार

केंद्रीय मंत्री असतांना मतदारसंघात गरोदर मातांना जीव गमवावा लागतो कसा? -आ.रोहित पवार

पेठ । प्रतिनिधी

केंद्रात राज्य आरोग्य मंत्री असतांनाही मतदार संघातील गरोदर मातांना आरोग्य सोयी सुविधा न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. सर्वाधिक माता बाल दगावण्याच्या घटना नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने या आदिवासी भागात झालेल्या आहेत. या भागात नव्याने दवाखाने मंजूर नाही. आदिवासींच्या आरोग्याशी खेळणार्‍या आरोग्य मंत्र्यास त्यांची जागा दाखविण्याचे आवाहन आ. रोहित पवार यांनी केले.

- Advertisement -

स्थानिक प्रश्रांवर बोलताना पवार म्हणाले नैर्सगिक साधन संपत्ती लाभलेल्या पेठ तालुक्यात अडीच हजार मिमी पाऊस पडत असतांना येथील आदिवासीला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. रोजगार व उपजीवेकेसाठी 8 महिने स्थलांतरीत व्हावे लागते, हे थांबविण्यासाठी पातळीवर धरणे, पाझर तलावाची निर्मिती करावी लागेल. परिणामी स्थानिक शेती विकसित झाली तर स्थानिक रोजगार निर्माण होईल. स्थलातंरासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण कायम स्वरूपी निकाली निघेल. या करिता केंद्रात व राज्यात आपल्या विचारांच्या प्रतिनिधींना पाठविण्याचे आवाहन रोहित पवार यांनी केले.

जे. पी. गावीत यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेचे प्रास्ताविक गावीत यांनी केले व्यासपिठावर रामदास चारोस्कर, सुनिल भुसारा, शिरिष कोतवाल, नितीन भोसले, जयंत दिंडे, कोंडाजी मामा आव्हाड, योगेश बर्डे, पुरुषोत्तम कडलग, अशोक बागुल, दि.ना उघाडे, भिका चौधरी, दामु राऊत, देवराम गायकवाड, मनोज घोंगे, तौफिक मनियार, संतोष रेहरे, नाना मोरे आदीसह राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) मार्क्सवादी पक्ष, भाकपा, डी वाय एफ महीला जनहितवादी संघटना, शिवसेना उबाठा, राष्ट्रीय काँग्रेस आदी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या