Saturday, May 4, 2024
Homeनाशिक‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई कधी?

‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई कधी?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महिना उलटूनही करोना संकट काळात आरोग्यसेवा नाकारणार्‍यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकिय विभागासाठी मागील महिन्यात झालेल्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर पॅरामेडीकल स्टाफ पदाच्या भरतीच्या मुलाखतीनंतर नियुक्ती आदेश देऊनही कामावर हजर होण्यात नकार देणारे व नियुक्ती आदेश दिल्यानंतर कामावर हजर होऊन पुन्हा गायब झालेल्या आरोग्य सेवकांना फौजदारी कारवाईचा इशारा प्रशासनाकडुन देण्यात आला होता.

महिना उलटूनही करोना संकट काळात आरोग्यसेवा नाकारणार्‍यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे आता या डॉक्टरांविरुध्द कधी कारवाई होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ऑगस्ट महिन्यात तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाकडुन आता 70 आरोग्य सेवकांवर गुन्हे दाखल करण्याच्या व 200 जणांवर मेस्मांतर्गत नोटीसा बजावण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.

मात्र त्यांची बदली झाल्यानंतर ही कारवाई थांबली आहे. शहराला करोनाचा विळखा बसत असतांना आता रुग्णालयात डॉक्टराची कमतरता भासत असुन कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालय याठिकाणी पुरेशे डॉक्टरांची व कर्मचारी नसल्याच्या तक्रारी नगरसेवक व रुग्णांचे नातेवाईक करीत आहे. काही ठिकाणी डॉक्टरांअभावी रुग्णांची स्थिती गंभीर होत आहे.

पुढच्या महिन्यात शहरातील रुग्णांचा आकडा 70 हजारावर जाण्याची शक्यता असुन मृत्युचा आकडा वाढता आहे. या एकुणच पार्श्वभूमीवर आता डॉक्टरांची कमतरता भासणार असुन महापालिका प्रशासनाकडुन तातडीने डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन भरती करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

मात्र यास वेळ जाणार असुन ऑगस्ट महिन्यात ज्या डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि 200 जणाविरुद्ध मेस्मा कायद्यांतर्गत नोटीसा पाठविण्याची कारवाई करण्यात येणार होती. नवीन आयुक्त कैलास जाधव हे ही कारवाई कधी करणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या