Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याएमआयडीसीला पोलीस ठाणे कधी?

एमआयडीसीला पोलीस ठाणे कधी?

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

शहरातील संवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत दिवसेंदिवस हाणामार्‍यांच्या घटनांत वाढ होत असून गुरुवारी झालेल्या दोन जणांच्या हत्येवरून आता तरी सदर चौकीला पोलीस ठाणे तयार करून येथील कर्मचारी संख्या वाढवा हि मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्द पाथर्डी फाटा ते विल्होळी, घरकुल योजना, म्हाडा कॉलनी, संजीव नगर, दत्त नगर, कारगिल चौक आदी भागांचा समावेश असून संपूर्ण अंबड औद्योगिक वसाहत देखील याच चौकीच्या अख्यत्यारीत येते. संजीवनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी चार जणांच्या टोळक्याने दोघांवर धारदार हत्याराने वार केले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पोलीस चौकीत एका शिफ्टमध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून 20 जण आहेत तर साप्ताहिक सुट्टी व खासगी सुट्टीच्या कारणाने प्रत्यक्षात एका शिफ्टसाठी केवळ 12 ते 14 जण कर्तव्यावर असतात. हद्दीची व्याप्ती बघता याठिकाणी पोलीस ठाण्याची नितांत गरज आहे शासनस्तरावरून तत्काळ येथे पोलीस ठाण्याला मंजुरी मिळणे गरजेचे आहे. कारण यामुळे येथील पोलिसांच्या संख्याबळात वाढ होऊन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील.

असे झाले आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता सह्यांची मोहीम, उपोषण, धरणे आंदोलन करण्यात आली. त्याचा काही उपयोग न झाल्याने नाशिक ते मुंबई मंत्रालय परिसरातील नागरिकांसह अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आ. सीमा हिरे यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना गरवारे पॉईंट येथे थांबवत तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे यांची भेट करून देत सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

गुन्हे नोंदीसाठी अंबड पोलीस ठाणे

पोलीस चौकीच्या हद्दीत कुठलाही गुन्हा घडला तर त्याची नोंद करण्यासाठी थेट अंबड पोलीस ठाण्यात जावे लागते. याचे कारण सदरहू चौकीला पोलीस ठाण्याचा दर्जा हा केवळ देण्यात आला, मात्र सर्व कागदोपत्री सोपस्कार हे अंबड पोलीस ठाण्यात जाऊनच पार पाडावे लागत आहे. गुन्हा घडल्यानंतर संशयितांचा शोध घेण्याकरिता बराच वेळ वाया जात असल्याचे दिसून येत आहे.

सध्याचे पोलीस बळ

पोलीस निरीक्षक :1

सहाय्यक पोलीस निरीक्षक : 1

उपनिरीक्षक : 3

अंमलदार/कर्मचारी : 35

एकूण बळ : 40

एका शिफ्टसाठी :20

आ. हिरेंची लक्षवेधी

नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सदरहू पोलीस चौकीऐवजी नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात यावे, याकरिता लक्षवेधी उपस्थित केली होती.

नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सदरहू पोलीस चौकीऐवजी नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात यावे, याकरिता लक्षवेधी उपस्थित केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या