Saturday, May 4, 2024
Homeनाशिकहनुमानाचा जन्म कुठे? आंध्र प्रदेशात, कर्नाटकात की अंजनेरीत

हनुमानाचा जन्म कुठे? आंध्र प्रदेशात, कर्नाटकात की अंजनेरीत

आज हनुमान जयंती. कोरोनामुळे हनुमान मंदिरांमध्ये भक्त नसणार. परंतु घरघरात ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’ ही धून वाजणार आहे. हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरीत झाला असल्याची श्रद्धा महाराष्ट्रातील भाविकांची आहे. यामुळे मोठ्या संख्येने भाविका दरवर्षी अंजनेरीला येतात. हनुमान जयंतीला मोठा उत्सव अंजनेरीत असतो. हजारो भाविक नाशिकमधून पायी हनुमानाच्या दर्शनासाठी जातात.

भगवान हनुमान जयंतीच्या आठवडाभर आधी तिरुमला तिरुपती देवस्थानने दावा की, तिरुमला टेकड्या याच हनुमानाचे जन्मस्थान आहे. चार सदस्यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर ही घोषणा देवस्थानने केली आहे. पौराणिक आणि पुरातत्त्वीय पुराव्यांचे आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला, असे अहवालात म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याला पुष्टी देणारा एक ग्रंथ देखील तिरुमला तिरुपती देवस्थान समितीकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या या दाव्याला कर्नाटकातील धर्मशास्त्रांनी अभ्यासकांनी आक्षेप घेतला.

- Advertisement -

कर्नाटकातून विरोध का?

कर्नाटकातील हम्पी म्हणजेच रामायण काळातील किष्किंदा असल्याचे सांगितले जाते. हम्पीजवळील अंजानाद्री हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा कर्नाटकातील धर्मशास्त्रांनी म्हटले आहे. हम्पी येथील खडकांवर तशा प्रकारची वर्णन करणारी काही दृश्‍ये कोरलेली आढळून आली आहेत. संगमाकल्लू, बेलाकल्लू येथील गुहांमध्ये अनेक चित्रे आढळून आली असून त्यामध्ये स्पष्टपणे हनुमानाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.

अंजनेरीत काय?

नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी जनमानसात प्रसिद्ध आहे ते हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले.

नाशिककरांची श्रद्धा का?

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील असंख्य भाविकांचा विश्वास असा आहे की, राम, लक्ष्मण, सीता नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. येथेच सीतागुफा आहे. लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक इथेच कापले म्हणून या गावाला ‘नासिक’ असे नाव पडले ज्यांचे पुढे नाशिक झाले. नाशिकमधील तपोवनात त्याची कथा सांगितली जाते. सीते मातेचे अपहरण येथूनच झाले. यामुळेच हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडले. इथे डोंगरावर अंजनी मातेचे आणि हनुमानाचं मंदिरही आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या