Wednesday, January 7, 2026
Homeभविष्यवेधकोणत्या ठिकाणी वॉटर फाउंटन लावावे ?

कोणत्या ठिकाणी वॉटर फाउंटन लावावे ?

फेंगशुईमध्ये असे काही उपाय सांगितले आहे जे जीवनातील नकारात्मकतेला दूर करतात आणि आनंद घेवून येतात. फेंगशुई ही चिनी वास्तुकला आहे. फेंगशुईमध्ये वॉटर फाउंटनचा नेहमी घर, खोली, अन्य जागी सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी उपयोग केला जातो.

घरात वॉटर फाउंटन लावण्याचे फायदे- फाउंटन लावल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. फेंगशुईच्या मते घरात नेहमी वाटरफॉल ठेवल्याने घरातील सदस्यांचे मन शांत राहते. जर तुमच्या कामात अडथळा निर्माण होत असेल तर फेंगशुईमध्ये सांगितलेले फाउंटन, वाटरफॉल घरात जरूर लावा. घरात तुम्हाला जर सुख-शांती आणि आनंद हवा असेल तर घरात वॉटर फाउंटन लावणे शुभ असते. फेंगशुईच्या मते घरात फाउंटन लावल्याने घरातील सदस्यांचे स्वास्थ चांगले राहते. पण लक्षात ठेवा की यात पाणी नेहमी वाहत असावे.

वॉटर फाउंटन लावण्याची योग्य दिशा कोणती-
फेंगशुईच्या अनुसार फाउंटन घराच्या उत्तर किंवा ईशान्यकोण दिशेला ठेवले पाहिजे. हे लावतांना नेहमी लक्षात ठेवा की पाणी सतत वाहत असावे. घरात बंद फाउंटन ठेवणे अशुभ असते. जर घरात फाउंटन ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही फाउंटनचा फोटो भिंतीवर लावू शकता.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...