Friday, November 22, 2024
Homeभविष्यवेधकोणत्या वस्तू तिजोरीजवळ ठेवू नये ?

कोणत्या वस्तू तिजोरीजवळ ठेवू नये ?

बर्‍याच लोकांची समस्या असते की कष्ट करतात, चांगले पैसे कमवतात पण त्यांच्याकडे पैसे टिकत नाही. अशा समस्यांमागे अनेक कारणे जबाबदार आहेत. घरातील किंवा दुकानातील तिजोरीत आपण मौल्यवान वस्तू आणि पैसे ठेवतात. पण वातुशास्त्रामध्ये तिजोरीबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत.

जर या नियमाचे पालन केल्यास आपल्या मेहनतीचे फळ मिळण्यास मदत होते. पण कधी कधी जाणून बुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो ज्या आपल्या दुर्दैवाचे कारण ठरतात. असे मानले जाते की काही वस्तू कधीही तिजोरीजवळ ठेवू नयेत.

चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

झाडू – तिजोरीजवळ झाडू कधीही ठेवू नये असे मानले जाते. पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवलेल्या तिजोरीजवळ झाडू ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. असे केल्याने धनहानी होते.

काळा कापड –
काळ्या रंगाचे कपडे अशुभ मानले जातात. त्यामुळे घराच्या तिजोरीजवळ कधीही ठेवू नये. यासोबतच तिजोरीत ठेवलेले पैसे किंवा दागिने काळ्या कपड्यात गुंडाळून ठेवू नयेत. तसेच पैसे नेहमी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा.

गलिच्छ भांडी – अनेकांना उष्टी भांडी जिथे खातात तिथे सोडायची सवय असते. आम्ही तुम्हाला सांगतो की तिजोरीजवळ कधीही घाण भांडी ठेवू नका. यासोबतच तिजोरीला उष्ट्या हातांनी स्पर्श करू नये. असे केल्याने धनहानी होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या