Saturday, July 27, 2024
Homeनाशिकशिक्षकांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद - दादा भुसे

शिक्षकांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद – दादा भुसे

नाशिक | प्रतिनिधी

प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकांचे स्थान महत्वपूर्ण असते. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतात, अथक परिश्रम व ज्ञानार्जनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

- Advertisement -

जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. भुसे म्हणाले, भविष्यातील आदर्श नागरिक घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. आज असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम देखील शिक्षकच राबवित असतात.

त्यासाठी काही शिक्षक स्वखर्चातून शाळांच्या विकासाला हातभार लावतात. तर काही गावातील नागरिकांना प्रेरीत करून त्यांच्या सहभागाने शाळांचा व विद्यार्थ्यांचा विकास साधत असतात. अशाच प्रतिकुल परिस्थिती व अथक परिश्रमातून ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या शिक्षकांची यापुढील जबाबदारी अधिकच वाढली आहे. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कामातून प्रेरणा घेवून इतर शिक्षकांनी काम करावे.

आमदार हिरे म्हणाल्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत. आपल्या ज्ञानदानाच्या कामातून उद्याचे आदर्श नागरिक घडणार असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर देखील भर द्यावा.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, नितीन बच्छाव यांच्यासह सर्व शिक्षक पुरस्कारार्थी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान:

प्रमिला पगार, प्राथमिक शिक्षिका, भिलदर, ता.बागलाण, वैशाली जाधव, प्राथमिक शिक्षिका, एकरुखे, ता.चांदवड, अर्चना आहेर, प्राथमिक शिक्षिका, पिंपळेश्वर (वा), ता. देवळा,

नौशाद अब्बास मुसलमान, प्राथमिक शिक्षक, परमोरी, ता.दिंडोरी, चित्रा देवरे, प्राथमिक शिक्षिका, अभोणा मुली, ता. कळवण, अनिल शिरसाठ, प्राथमिक शिक्षक, , जामुंडे, ता.इगतपुरी, प्रतिभा अहिरे, प्राथमिक शिक्षका, वजीरखेडे, ता. मालेगाव, देवेंद्र वाघ, प्राथमिक शिक्षक, देवीचा माथा, ता.निफाड, उत्तम पिवार, प्राथमिक शिक्षक, हनुमान वाडी, ता.नाशिक,

राजकुमार बोरसे, मुख्याध्यापक, साकोरा, ता.नांदगाव, रवींद्र खंबाईत, पदवीधर प्राथ. शिक्षक, मोहपाडा ता.पेठ, संतोष झावरे, आशापुरी(घोटेवाडी) ता.सिन्नर, परशराम पाडवी, प्राथमिक शिक्षक, शिंदे (दि) ता.सुरगाणा, बालाजी नाईकवाडी, प्राथमिक शिक्षक, पांडववाडी, ता. येवला, अर्चना गाडगे, प्राथमिक शिक्षिका, हेदुलीपाडा ता. त्र्यंबकेश्वर

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या