Monday, March 31, 2025
Homeनंदुरबारनंदुरबारमध्ये डोंगर रांगांवर पांढरी चादर

नंदुरबारमध्ये डोंगर रांगांवर पांढरी चादर

नंदुरबार nandurbar

हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस (Heavy rain) झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे डोंगर रांगांवर (mountain ranges) बर्फाची पांढरी (white sheet of snow) चादर दिसून आली.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार गारपीट आणि पाऊस झाला. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ठाणेपाडा परिसरात डोंगर रांगांवर बर्फाचे मोठे खच दिसून येत आहे. या परिसरात जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. डोंगर रांगांवरील बर्फाची चादर आणि रस्त्याच्या बाजूला लागलेला बर्फाचा खच पाहून आपण शिमला येथे आलो की काय अशी स्थिती होती.

गेल्या दहा दिवसांपुर्वी साक्री तालुक्यातील छडवेल परीसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती.त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील 1500 हेक्टरवर असलेल्या पीकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण होत नाहीत तेवढ्यात 13 मार्च रोजी पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकुळ घातल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.

आज पुन्हा दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात झोडपले. दरम्यान धुळे -नंदुरबार सिमावर्ती भाग असलेल्या नंदुरबार तालुक्यातील हरिपूर, अजयपूर, ठाणेपाडा, आष्टे, केवडीपाडा, वाघाडे, सोनगीरपाडा यासह विविध गावात सुमारे 20 मिनीटे गारपीट झाली. यात परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर गहु,हरभरा, मका,सोयाबीन,कांद्यासह विवीध पीकांचे नुकसान झाले आहे.राज्य कर्मचार्‍यांचा संप केव्हा मिटेल व शेतकर्‍यांच्या नुकसान झालेल्या पीकांचे केव्हा पंचनाम होईल या चिंतेत शेतकरी वर्ग दिसून येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

यंदा भरपूर पाऊस, अन्नधान्यही मुबलक

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडून...