Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशअदानीनंतर आता कोणाचा नंबर? Hindenburg Research च्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

अदानीनंतर आता कोणाचा नंबर? Hindenburg Research च्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

दिल्ली । Delhi

वर्षभरापूर्वी अदानी ग्रुपचे (Adani Group) प्रमुख गौतम अदानी यांचे साम्राज्य हादरवून सोडणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) आज पुन्हा पोस्ट (X Post) करत भारतासंदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी ट्विट करून खळबळ उडवून दिली आणि भारताबाबत नवीन अहवाल येण्याची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

हिंडनबर्ग रिसर्चने आज (१० ऑगस्ट) सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट केलीय. हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या पोस्टमध्ये ‘भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे,’ असे लिहिले. . त्यामुळे आता अदाणी नंतर कोंन ? या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच यामुळे भारतीय उद्योग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. हिंडनबर्गच्या या शक्यतेचा शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्गने आपल्या एका अहवालाने उद्योग विश्वच नाही तर भारतीय शेअर बाजारालाही मोठे हादरे दिले होते. जानेवारी २०२३ मध्ये हिंडनबर्गने अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करत एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी पडझड झाली. हिंडेनबर्ग अहवालात समुहाद्वारे स्टॉकच्या किंमतीत फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांशी संबंधित असून यामध्ये अदानींनी त्यांच्या समभागांच्या किमती वाढवल्याचा आरोप करण्यात आला असून अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या अदानी समूहाच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

या प्रकरणी हिंडनबर्गला सेबीने नोटीसही पाठविली होती. हिंडनबर्गने कोटक महिंद्रा बँकेबाबतही असाच खुलासा केला होता. तेव्हा देखील कोटकच्या शेअर मुल्यात मोठी घसरण झाली होती. आता कोणत्या कंपनीचा नंबर लागणार आहे, याची धाकधुक कंपन्यांच्या मालकांबरोबरच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्येही लागून राहिली आहे.

हिंडनबर्ग रिसर्च काय आहे?

हिंडनबर्ग रिसर्च ही एक अमेरिकेतील गुंतवणूक कंपनी आहे. जी Nathan Anderson या एका व्यावसायिकाने सुरु केली होती. याची स्थापना २०१७ मध्ये झाली होती. कंपनी दावा करते की, ते फॉरेंसिक फाइनेंशियल रिसर्चमध्ये एक्सपर्ट आहे. त्यांच्याकडे काही दशकांचा अनुभव ही आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही कंपनी असामान्य सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवर तपास करते, जे शोधणे अत्यंत कठीण असते. कंपनीची सुरुवात याआधी त्यांनी Harry Markopolos यांच्यासोबत ही काम केले होते. ज्यांनी Barine Madoff च्या पोंजी स्किमचा पर्दाफाश केला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...