Wednesday, May 27, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीच्या हॉटेलमध्ये अशोक खरातला भेटलेले तीन आयएएस अधिकारी कोण? याचा...

Shirdi : शिर्डीच्या हॉटेलमध्ये अशोक खरातला भेटलेले तीन आयएएस अधिकारी कोण? याचा उलगडा होणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अटकेनंतर नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच खरातच्या अटकेच्या अवघ्या 3 दिवस आधी शिर्डीत एक गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ही बैठक विनोद नामक व्यक्तीने घडवून आणली होती. त्यामुळे पोलिसांनी आता या विनोदचा शोध सुरू केला आहे. ही व्यक्ती सापडल्यानंतर या बैठकीचा उलगडा होणार आहे.

- Advertisement -

भोंदू अशोक खरात याला अटक होण्याच्या 72 तास आधी शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एक नामाकिंत हॉटेलात अशोक खरातसाठी बुकींग करण्यात आले होते. दुसर्‍या हॉटेलात संबंधित अधिकार्‍यांसाठी रूम बुक करण्यात आली होती. तर तिसर्‍या हॉटेलात बैठक झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही बैठक घडवून आणण्यात ‘विनोद’ नावाच्या एका व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. आता या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

18 फेब्रुवारी रोजी खरातवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, ही बैठक कारवाई रोखण्यासाठी होती की पुरावे नष्ट करण्याची रणनीती आखण्यासाठी? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पीडित महिलांवर अत्याचार करून त्यांना आत्महत्येच्या टोकापर्यंत नेणार्‍या खरातला आतापर्यंत कोणाचे संरक्षण मिळत होते, याचा शोध आता विशेष तपास पथक घेत आहे. या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स हाती लागल्यास अनेक बड्या सनदी अधिकार्‍यांचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे. या हाय-प्रोफाईल कनेक्शनमुळे आता जनतेतून संताप व्यक्त होत असून, भोंदूला वाचवणारा खरा‘आड’ कोण? असा सवाल विचारला जात आहे.

विनोद आहे तरी कोण ?
अशोक खरातची आयएएस अधिकार्‍यांसोबत बैठक सेट करणारा हा विनोद आहे तरी कोण? असा सवाल विचारला जात आहे. विनोद हा खरातचा शिर्डी परिसरातील अत्यंत जवळचा ‘पंटर’ असल्याचं समजतंय.

ताज्या बातम्या

Pathardi : पोलिसांवर गुन्हा दाखल करा; खर्चन मृत्यूप्रकरणी वंचितचे ठिय्या आंदोलन

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi पोलीस स्टेशनच्या आवारात सोमवारी (दि.25) मृत झालेल्या विठ्ठल रावसाहेब खर्चन प्रकरणी पोलीस निरीक्षक विलास पुजारी व इतर कर्मचार्‍यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा...