Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याकोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? कायदा आम्हालाही कळतो; शिंदे यांचे प्रत्युत्तर

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? कायदा आम्हालाही कळतो; शिंदे यांचे प्रत्युत्तर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेनेने १२ आमदारांवर ( Shivsena MLA’s ) अपात्रतेची कारवाई करण्याच्या मागणीला एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

- Advertisement -

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या १० व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.

यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. १२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.

कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या