Saturday, July 27, 2024
Homeनाशिकइंदिरानगर वरिष्ठ निरीक्षकांवर वरदहस्त कोणाचा?

इंदिरानगर वरिष्ठ निरीक्षकांवर वरदहस्त कोणाचा?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

शिंदे गावानजिक सापडलेल्या एम. डी. ड्रग्ज प्रकरणात नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर अनेक महिन्यांपासून वडाळागावात खुलेआम एम. डी. विक्रीचा काळाबाजार सुरु असल्याचे उघड होऊनही मात्र इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर मेहरनजर का? असा सवाल इंदिरानगरवासियांमधून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

वडाळागाव परिसरात संशयित नसरीन शेख उर्फ छोटी भाभी ही महिला अनेक महिन्यांपासून खुलेआम एम. डी. नामक ड्रग्ज विकत होती. ही बाब समस्त वडाळागाववासियांना माहीत असताना इंदिरानगर पोलिसांना कोणतीही माहिती नसावी आणि ती का? तर याबाबत पोलीस प्रशासनाचे या महिलेशी आर्थिक लागेबंधे असल्याचा थेट आरोप इंदिरानगरवासियांनी केलेला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा : शॉर्ट्स, रील्स, पोस्टर्सने वेधले मतदारांचे लक्ष

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारतात समस्त नाशिक शहरात अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेशित केले असतांनाही इंदिरानगर पोलीस ठाण्याच्याच हद्दीतील पेरूचा बागनजीक गेल्या अनेक महिन्यांपासून जुगार अड्डा राजरोज सुरु होता.

तर हा जुगार अड्डा महिन्याप्रमाणे आर्थिक देवाणघेवाणीतून सुरु होता का? असा आरोप स्थानिकांमधून करण्यात आला आहे. सदरहू बाब परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांच्या निदर्शनास आल्यानंतर इंदिरानगर पोलिसांना थांगपत्ताही नसताना उपायुक्त यांनी विशेष पथक तयार करून या क्लबवर धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमालसह खेळींना अटक केली.

यावरून पोलीस उपायुक्त यांना इंदिरानगर पोलिसांवर विश्वास नसल्यानेच विशेष पथक तयार करून ही कार्यवाही झाली असल्याची कुजबुज पोलीस ठाण्यातील वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाची पायमल्ली करत कोणाच्या कृपाआशीर्वादाने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु होते, याबाबत सखोल चौकशी होईल का? यास जबाबदार असणार्‍या अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर देखील कार्यवाही होईल का? असा प्रश्न इंदिरानगरवासियांमधून उपस्थित करण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Gaganyaan Mission Test : इस्रोचे मोठे यश! ‘गगनयान’ अवकाशात यशस्वीपणे झेपावलं

- Advertisment -

ताज्या बातम्या