Friday, May 16, 2025
Homeदेश विदेशजागतिक आरोग्य संघटनेच्या मास्क वापरण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना

जागतिक आरोग्य संघटनेच्या मास्क वापरण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना

सार्वमत

- Advertisement -

पुणे (प्रतिनिधी) – जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी करोनो व्हायरस महामारी दरम्यान फेसमास्क घालण्यासंबधात नवीन मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. डब्ल्यूएचओने, कुणी मास्क घातला पाहिजे, केव्हा घातला पाहिजे आणि मास्क कशाने तयार केलेला असावा, याबाबत आपला दृष्टीकोन बदलला आहे. एका आभासी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अदनोम यांनी सल्ला दिला आहे की, सरकारने आपल्या जनतेला अशा ठिकाणी मास्क घालण्यास प्रोत्साहित केल पाहिजे, जेथे व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसेच लोकांना आपसात अंतर ठेवणे अवघड झालेले आहे. जसे की पब्लिक ट्रान्सपोर्ट, दुकाने किंवा अशी जागा जेथे खूप गर्दी असते.

कम्युनिटी ट्रान्समिशनच्या परिसरात सल्ला दिला आहे की, जे लोक 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत, किंवा असे लोक ज्यांना गंभीर आजार आहेत, त्यांनी अशा स्थितीत मेडिकल मास्क घातला पाहिजे, जेथे लोकांना अंतर ठेवणे शक्य नाही. विना-मेडिकल फॅब्रिक मास्कच्या बनावटीबाबत सुद्धा नवी गाइडलाईन जारी केली आहे, ज्यामध्ये हा सल्ला दिला आहे की, मास्कमध्ये विविध मटेरिअलचे किमान चार पदर असणे गरजेचे आहे. मास्क व्हायरसला दूर ठेवण्यासाठी प्रभावी रणनीतीचा केवळ एक भाग आहे. लोकांनी हे समजू नये की, तो घातल्याने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

मास्कला फिजिकल डिस्टन्सिंग आणि हँड हायजीनचा पर्याय मानता येणार नाही. केवळ मास्क घातल्याने कोणतीही व्यक्ती करोनापासून वाचू शकणार नाही. प्रत्येक प्रकरणाचा शोध घ्या, त्यास विलग करा आणि देखभाल करा, अणि प्रत्येक संपर्काचा शोध घेऊन त्यास क्वारंटाइन करा. हीच ती पद्धत आहे जी आम्हाला माहित आहे आणि जी करोनाच्या विरूद्धच्या लढाईत काम करते. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमधून पसरलेल्या महामारीनंतर आतापर्यंत जगभरात करोना व्हायरसने किमान 66 लाख लोकांना संक्रमित केले आहे आणि 3,90,000 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोदी

“आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे…”शरद पवार, बाळासाहेब...

0
मुंबई | Mumbai शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे आगामी पुस्तक 'नरकातला स्वर्ग'चे प्रकाशन शनिवारी होणार आहे. या पुस्तकात अनेक धक्कादायक दावे-प्रतिदावे...