Monday, November 25, 2024
Homeनगरनव्यामंत्री मंडळात नगरमधून कोणाला मिळणार संधी?

नव्यामंत्री मंडळात नगरमधून कोणाला मिळणार संधी?

भाजपकडून विखे यांच्यासोबतच आ. राजळे, कर्डिले यांची वर्णी लागण्याची शक्यता || अजितदादा गटाचे आ. काळे, आ. जगताप यांच्या नावांचीही चर्चा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्राच्या नकाशावर महत्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या तितकाच प्रभावशाली असणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी चार असे आठ आमदार निवडून आलेले आहेत. यात आठव्यांदा राधाकृष्ण विखे पाटील विक्रमी मतांनी विजयी झाले असून त्यांच्यासोबत राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात कोणा कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यंदा भाजपकडून विजयाची हॅटट्रिक साधणार्‍या आणि जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असणार्‍या मोनिकाताई राजळे यांच्यासोबत विधानसभेत जोरदार एन्ट्री करणारे राहुरीचे आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

त्याच सोबत राज्यात विक्रमी मताने विजयी झालेले कोपरगावचे आ. आशुतोष काळे आणि नगर शहरातून तिसर्‍यांदा यश संपादन करणारे अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप यांचे नावे नाव आघाडीवर असून यापैकी कोणाकोणाला महायुतीच्या नवीन मंत्री मंडळात संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचे सर्व आमदार तातडीने मुंबईत रवाना झाले आहे. दरम्यान राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

यात 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचे 132 आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना 8 ते 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला किती मंत्री पद येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असतांना नगर जिल्ह्याला यापूर्वी तिन कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहेत. यात काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीने पालकमंत्री म्हणुन जिल्ह्यात काम केलेले आहे. मात्र, यंदा जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद समसमान असल्याने कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे आहेत मंत्रीपदाच्या स्पर्धे
ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (मंत्रिपद फिक्स)
आ. मोनिकाताई राजळे (तिसर्‍यांदा आमदार भाजप)
शिवाजीराव कर्डिले (ज्येष्ठ नेते)
आ. संग्राम जगताप (तिसर्‍यांदा आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट
आ. आशुतोष काळे (राज्यातील सर्वाधिक मतांनी विजयीपैकी एक)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या