मुंबई
- Advertisement -
शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सूचिबद्ध झाल्याने आता दीड वर्षांनंतर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
२ जुलैला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरणी १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना चिन्हाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





