Thursday, September 12, 2024
Homeमुख्य बातम्याEknath Shinde : "मला तुम्ही पाण्यात का पाहताय"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

Eknath Shinde : “मला तुम्ही पाण्यात का पाहताय”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

बुलढाणा | Buldhana

राज्य सरकारचा महत्वाचा उपक्रम असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज बुलढाण्यात (Buldhana) पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अनुपस्थित होते. या दोघांच्याही अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यावरही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण देत मराठा आंदोलनावर देखील भाष्य केले…

- Advertisement -

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जालन्यातील (Jalna) घटना दुर्दैवी आहे. ही घटना कशामुळे झाली, हे शोधण्यासाठी काही लोक येऊन गेले. ज्या लोकांनी आरक्षणाचा गळा घोटला तेच याठिकाणी गळा काढायला आले होते,” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर निशाणा साधला. तसेच अशोक चव्हाणजी, तुम्ही तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता, तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केले? आरक्षणासाठी तुम्ही काहीही केले नाही, याचा मी साक्षीदार आहे,” असा आरोपही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केला.

Nashik News : गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख यांचे अपहरण

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी शेतकऱ्याचा (Farmer) पुत्र आहे. गरीब शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. मीही सर्वसामान्य एक मराठा आहे. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं नसतं. सरकार पडेल म्हणून नुसती चर्चा होते. आता अजित पवार देखील आमच्यासोबत आले. मुख्यमंत्री बदलणार म्हणून आता ओरड सुरु आहे. एका शेतकऱ्याच्या पुत्रामागे तुम्ही का लागला आहात? असा सवालही मुख्यमंत्री शिंदेंनी केला.

तसेच मला तुम्ही पाण्यात का पाहताय, मी काम करतो म्हणून. सर्वसामान्यांमध्ये मिसळतो म्हणून, ईरशाळवाडीमध्ये मी पीडितांना भेटायला गेलो हा माझा गुन्हा आहे का? महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी मदतीला गेलो, शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतो हा माझा गुन्हा आहे का? मी धनदांडगा नाही म्हणून, तोंडात सोन्याचा चमचा नाही म्हणून की माझे बापजादे मंत्री-आमदार नाहीत म्हणून. एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला म्हणून मला पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पण, जोपर्यंत ही जनता माझ्यासोबत आहेत,तोपर्यंत माझे काहीही होणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Sinnar Crime News : भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश; लाखोंचा साठा हस्तगत

तर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुपस्थितीबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नियोजित दौऱ्यावर असल्याने ते या कार्यक्रमाला गैरहजर आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी कार्यक्रमाला येणे टाळले. त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थितीत आहेत म्हणून ते नाराज आहे अशी पत्रकारांनी बातमी लावू नये, अशी विनंतीही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Road News : बनावट गुटखा बनविणारा कारखाना उद्ध्वस्त

- Advertisment -

ताज्या बातम्या