Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाधोनीने 62 लाखांची गाडी का घेतली 1.16 कोटींना विकत !

धोनीने 62 लाखांची गाडी का घेतली 1.16 कोटींना विकत !

मुंबई – Mumbai

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने Mahendra Singh Dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. आपला आवडता माही हा क्रिकेटमधून निवृत्त होणार या घोषणेनं तमाम चाहत्यांना अश्रू अनावर झाले. पण, धोनीने जसे मैदान गाजवले तसेच त्याचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा होते. धोनीला बाइक आणि गाड्यांचा प्रचंड छंद आहे. त्याच्याकडे आता एकापेक्षा एक गाड्यांचे कलेक्शन आहे. महागड्या आणि सुपरकार्स धोनीकडे आहे. एवढंच नाहीतर धोनीकडे जुन्या बाइक्स सुद्धा आहे.

- Advertisement -

धोनीला Jeep Grand Cherokee Trackhawk ही प्रचंड आवडली होती. त्यामुळेच त्याने ही शानदार गाडी तब्बल 1.16 कोटींना खरेदी केली. या गाडीत 6.2-लिटर सुपरचार्ज्ड V8 HEMI इंजिन आहे. या इंजिनमधून तब्बल 707 bhp पॉवर आणि 875 Nm इतका टॉर्क जनरेट होतो. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे.

एवढंच नाही तर या गाडीत 4-व्हील ड्राइव्ह सिस्टम दिली आहे. ही कार 3.62 सेंकदात 0-100 किलोमीटर प्रतितास इतका वेग गाठते. या गाडीची केबिन ही Nappa लेदरने तयार करण्यात आली आहे.

Jeep Grand Cherokee Trackhawk ची मुळ किंमतही 62 लाख रुपये आहे. पण त्यावेळी ही गाडी भारतात लाँच झाली नव्हती. त्यामुळे ही गाडी भारतात विक्री होत नव्हती. त्यामुळे धोनीने ही गाडी बाहेर देशातून मागवली. यासाठी त्याने जवळपास 1.16 कोटी रुपये मोजले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून एखादी वस्तू भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागतो, त्यामुळेच या गाडीची किंमतही 62 लाखांवरून 1.16 कोटींवर पोहोचली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या