Monday, November 25, 2024
HomeमनोरंजनMeenakshi Sheshadri Birthday : ९० च्या दशकांत यशाच्या शिखरावर असताना 'मीनाक्षी शेषाद्री'ने...

Meenakshi Sheshadri Birthday : ९० च्या दशकांत यशाच्या शिखरावर असताना ‘मीनाक्षी शेषाद्री’ने चित्रपटसृष्टीला का केला रामराम?

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri).

मीनाक्षी शेषाद्री आज (१६ नोव्हेंबर) आपला ५८ वा वाढदिवस साजरा (Birthday Special) करत आहे.

- Advertisement -

आपल्या चित्रपट कारकीर्दीत मीनाक्षीने अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले. आपल्या अभिनयाच्या खास शैलीने लोकांच्या हृदयात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले.

‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला.

इतकी प्रसिद्धी मिळूनही यशाच्या शिखरावर असताना मीनाक्षी शेषाद्रीने मनोरंजन विश्वाला रामराम म्हणत परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

‘पेंटरबाबू’ या चित्रपटातून मिनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिला ‘हिरो’ या चित्रपटातून खरी ओळख मिळवून दिली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि मिनाक्षी रातोरात स्टार झाली.

लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून दुरावा निर्माण करणापी मिनाक्षी अमेरिकेत शिफ्ट झाली. तिने टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ चालवण्यास सुरुवात केली. या स्कुलमध्ये ती मुलांना शास्त्रीय नृत्याचे धडे देते.

झारखंडच्या सिंदरी येथे जन्मलेल्या मीनाक्षी शेषाद्रीचे खरे नाव शशिकला शेषाद्री आहे. भरतनाट्यम, कुचीपुडी, कथक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्याच्या ४ शैलींचे तिने शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे.

नृत्यनिपुण असणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीने १९८१ मध्ये ‘इव्ह विकली मिस इंडिया’ हा किताब आपल्या नावे केला. त्यानंतर त्याच वर्षी टोकियोमध्ये पार पडलेल्या ‘मिस इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

मिनाक्षी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अमेरिकेत राहत असलेल्या घरातून सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या