Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधनारळ का फोडतात ?

नारळ का फोडतात ?

एखाद्या शुभकार्याची सुरुवात करणं असो किंवा मग आणखी कोणतं काम. अनेकदा नारळ फोडण्याची/ वाढवण्याची प्रथा असते. काही प्रसंगी नारळ मंदिरात किंवा काही प्रसंगी देवापुढे फोडला जातो. पण, यामागे नेमकं कारण काय आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हिंदू संस्कृतीमध्ये श्रद्धेच्या पोटी ज्या कृती केल्या जातात त्या प्रत्येक कृतीमागे एक कारण असतं. एक असं कारण ज्याचा अर्थही तितकाच महत्त्वाचा.

मंदिरांमध्ये नारळ फोडणं हे अतिशय शुभ मानलं जातं. यामागे अनेक समजुती आहेत. थोडं मागच्या काळामध्ये डोकावलं, तर त्यावेळी सहसा देवदेवतांना मान देत असताना प्राण्यांचा बळी दिला जात होता. पण, ही हिंसा समाजातील काही घटनांना सहन झाली नाही आणि त्यांनी ही प्रथाच मोडित काढत त्याऐवजी देवदेवतांना मान म्हणून नारळ फोडण्यास सुरुवात केली.

नारळ फोडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, हे एक प्रकारे स्वत:ला मोठ्या विश्वासानं आपल्याला वंदनीय असणार्‍या देवाच्या स्वाधीन करणं होय. नारळ फोडत असताना त्याच्यासोबत आपल्यात असणारा स्वाभिमान, स्वार्थ, ईर्ष्या या सार्‍या गोष्टी त्या जोरात आपटून फोडाव्यात आणि निर्मळ मनानं आपल्या स्वगृही परतावं, अशीही एक समजूत आहे.
त्यामुळं यापुढे तुम्ही कधीही देवाला मान म्हणून नारळ फोडत असाल तर, मनातील संकल्प देवापुढे सोडण्यासोबतच सर्व वाईट प्रवृत्तींचाही नाश होणारे ही बाब कधीच विसरु नका.

देशात अशी अनेक मंदिरं आहेत जिथं देवाच्या नावानं नारळ वाढवले जातात. आता या इतक्या नारळांचं काय करत असतील ही मंडळी? तर काही भागांमध्ये हे नारळ त्यापासून तयार केल्या जाणार्‍या पदार्थांमध्ये वापरले जातात. काही भागांमध्ये हे नारळ तेल काढण्यासाठी वापरात आणतात. तर काही मंदिरांमध्ये तिथं येणार्‍या भक्तांना ते प्रसाद स्वरुपात दिले जातात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...