Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशखाद्यतेल का महाग होत आहे ? जाणून घ्या कारण

खाद्यतेल का महाग होत आहे ? जाणून घ्या कारण

सध्या दोन तेलांनी सर्वसामान्यांच्या नाकात दम आणला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना दोन तेलांचे दर आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आहे आणि सरकार नावाचे शासन, प्रशानस हतबल आहे. पेट्रोल शंभरीपार गेले असल्याने आता सायकल पर्याय आहे का? असा प्रश्न वाहनधारांना पडला असतांना किचन सांभाळणाऱ्या गृहमंत्री खाद्यतेलाच्या दरवाढीने हैराण झाल्या आहे. कारण काही महिन्यांपुर्वी १२५ रुपयांत मिळणारे शेंगदाणा तेलाने डबल सेंच्चुरी मारली आहे. म्हणजेच पेट्रोलची सेंच्च्युरी व शेंगदाणा तेलाच्या डबल सेंच्चुरीने महागाईचा कळस गाठला आहे. खाद्यतेलाच्या दरातील ही गेल्या ११ वर्षांतील सर्वाधिक दरवाढ आहे. जाणून घेऊ या का वाढत आहे खाद्य तेलाचे दर?

…तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही

- Advertisement -

पेट्रोल-डिझेल म्हणजेच ८२ टक्के खनिज तेल आपण आयात करतो, हे सर्वांना माहीत आहे. त्यावर लावलेले भरमसाठ करामुळे ४० रुपयांचे पेट्रोल शंभर रुपयांना आपण घेत आहोत. आत्मनिर्भर भारताच्या आपण गप्पा मारत असतांना खाद्यतेलासाठी आपण आयातीवर आमलंबून असतो. जवळपास ७० टक्के खाद्यतेल आपणास आयात करावे लागते.

खाद्यतेलात आपण शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, तीळचा वापर करतो. परंतु किचनमध्ये नाही तर हॉटेल, लोटगाड्यांवर ज्या तेलाचा वापर करतो ते पामतेल आयात केले जाते. सरकार आकडेवारीनुसार आपण जवळपास ६० टक्के पाम तेल सेवन करतो. या पाम तेलाचे सर्वात मोठे पुरवठादार मलेशिया आणि इंडोनेशिया आहे. मलेशिया आणि इंडोनेशियात पाम लागवड क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचा तुटवडा होता. तेथे मजुरांचा तुटवडा, तर अर्जेंटिना, युक्रेन या देशातील पर्यावरणीय बदलांचा सूर्यफूल आणि सोयाबीनवर झालेला परिणाम अशा अनेक कारणांनी आपणास दरवाढीचा सामना करावा लागला. तसेच चीनने अफाट पामादी तेलांची खरेदी केली आहे. त्यामुळेही बाजारात तुटवडा निर्माण झाला आणि परिणामी आपणास जास्त दाम मोजावा लागला.

आपले तेलबियांचे लागवडी क्षेत्र आहे सुमारे अडीच कोटी हेक्टर आहे. त्यातून आपल्या गरजेच्या २५ ते ३० टक्के इतकेच खाद्य तेल आपण देशांतर्गत तेलबियांतून गाळू शकतो. म्हणून मग तेल आयात करावे लागते. २०१९ मध्ये भारतास दीड कोटी टन खाद्यतेल आयात करावे लागले.तो खर्च तब्बल ७३०० कोटी रुपये आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध कारणांनी खाद्यतेलनिर्मितीचा भांडवली खर्च वाढतच अाहे. यामुळे खाद्यतेल आयातीवर आपला खर्च अजून वाढणार आहे. हरितक्रांतीपुर्वी आपण अन्नधान्यासाठी विदेशी मदतीवर अवलंबून होतो. परंतु त्यानंतर आपण स्वंयपुर्ण झालो. आता सर्वच गोष्टीत आत्मनिर्भर होण्याची हाक आपण देत असताना खनिच नाही तर खाद्यतेलात आपण आत्मनिर्भर होणार आहोत का? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या