Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधजपानी मांजर लकी का मानली जाते ?

जपानी मांजर लकी का मानली जाते ?

फेंगशुईमध्ये जपानी मांजरीला सुख-शांतीे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. फेंगशुईमध्ये लोक आपल्या घरात आणि दुकानांमध्ये लॉफिंग बुद्धा, विंड चाइम आणि क्रिस्टल शिवाय घरात लकी देखील ठेवतात. फेंगशुईनुसार असे मानले जाते की लकी कॅट ठेवल्याने येणारे संकट टळून जातात. लकी कॅटचा एक हात उभा असतो आणि तो सतत हालत असतो.
या लकी कॅटला मनी कॅट पण म्हणतात जी जपानहून आली आहे. या जपानी मांजरीची कथा फारच रोचक आहे.

जपानी मान्यतेनुसार, एक वेळा धन देवता नगर भ्रमणावर होते आणि अचानक पाऊस येऊ लागला. या पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी एका झाडाचा सहारा घेतला आणि खाली उभे राहिले. तेव्हाच त्यांची नजर कोपर्‍यात बसलेल्या ऐका मांजरीवर पडली जी हात हालवून त्यांना बोलवत होती. तेव्हा धन देवता तिच्याजवळ गेले. तेव्हाच वीज कडकडून ते झाड पडले आणि पाण्यात वाहून गेले ज्याच्या खाली ते देवता उभे होते. शेवटच्या वेळेस मांजरीने बोलावल्यामुळे धन देवताचा जीव वाचला. त्यानंतर मांजरीच्या मालकाला त्यांनी धनवान बनण्याचा आशीवार्द दिला.

काही दिवसांनंतर मांजरीचा मृत्यू झाला व तिच्या मालकाने तिला जमीनीत पुरले आणि तिच्या आठवणीत मानकी निको नावाची हात हालवणार्‍या मांजरीची मूर्ती बनवली. यानंतर संकटांपासून बचाव करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी हात हालवणार्‍या मांजरीची मूर्ती घरोघरी ठेवण्यात येऊ लागली. फेंगशुईनुसार लकी कॅटे बर्‍याच रगांमध्ये मिळतात. रंगानुसार याचे फळ देखील वेगवेगळे मिळतात.

तर जाणून घेऊ कोणत्या रंगाची मांजर ठेवल्याने काय फायदे होतात.

आर्थिक प्रगती मिळविण्यासाठी घर आणि दुकानात सोनेरी रंगाची मांजर ठेवायला पाहिजे. सतत पैसे मिळवण्यासाठी निळ्या रंगाची मांजर ठेवणे शुभ ठरत. याला कुबेराची दिशा दक्षिण-पूर्वेकडे ठेवायला पाहिजे. आपले सौभाग्य वाढण्यासाठी हिरव्या रंगाची मांजर उत्तर-पूर्व दिशेकडे ठेवणे शुभ असते. घरात लाल रंगाची मांजर दक्षिण- पश्चिम दिशेत ठेवल्याने नवरा बायकोत प्रेम वाढत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...