Wednesday, March 26, 2025
Homeभविष्यवेधमंदिरातील गाभार्‍यासमोर का असतं कासव?

मंदिरातील गाभार्‍यासमोर का असतं कासव?

कोणत्याही मंदिरात गेलं असता काही गोष्टी हमखास पाहायला मिळतात. ज्यामध्ये शंकराच्या मंदिरापुढे जसा नंदी आणि गणपतीच्या मंदिरामध्ये मूषक असणं अपेक्षित असतं अगदी तसंच जवळपास सर्व मंदिरांमध्ये कासवाची प्रतिमा असणंही अपेक्षित असतं. तुम्ही आतापर्यंत भेट दिलेली मंदिरं आठवा जरा, मुख्य पार्‍यांवरून पुढे गेल्यानंतर नकळत समोर आलेल्या कासवाच्या मूर्तीपुढे तुम्हीही नतमस्तक झाला असाल.

लहानपणापासूनच जेव्हाजेव्हा आपण एखाद्या मंदिरात जात आलोय तेव्हातेव्हा प्रत्येक वेळी मोठ्यांचं अनुकरण करत आपणही त्या कासवाच्या पाया पडून त्याच्यापुढे हात जोडले आहेत. किंबहुना आजही अनेकांना हेच संस्कार दिले जातात. पण, देवाच्या मंदिरात हे कासव करतंय तरी काय? हा प्रश्न पडलाय का कधी तुम्हाला?

जाणून घ्या मंदिरांसमोर कासव असण्यामागचं कारण…

असं म्हणतात की कासव हे प्रतीक रुप आहे. श्रीविष्णूच्या दशावतारांमधील दुसरा अवतार हा कासवाचा होता. इथं अशी दंतकथा सांगितली जाते, की बुडत्या पृथ्वीला कासवाच्या रुपात श्रीविष्णूंनी आपल्या पाठीवर आधार दिला आणि त्या क्षणापासून विष्णूंच्या या रुपाची संपूर्ण ब्रह्मांडाला प्रतीची आली. असं म्हणतात की, कासव हे शांततोसोबतच दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. मंदिरात कासव असण्याचं कारण म्हणजे ज्याप्रमाणं मादी कासव आपस्या पिलांकडे कायम वास्तल्यदृष्टीनं पाहते तशीच कृपा देवानं भक्तरुपी लेकरांवर ठेवावी. इतकंच नव्हे, तर कासव ज्याप्रमाणे शरीराचे बहुतांश अवयव कवचाखाली घेऊन आत्मसंरक्षण करतो त्याचप्रमाणे मानवानेही क्रोध, मत्सर आणि मोह अशा वृत्तींचा त्याग करत त्यापासून आत्मसंरक्षण करत नंतरच देवापुढे उभं राहावं असा संदेश कासवाकडून मिळत असतो.

जाणून आश्चर्य वाटेल पण, कासव ज्याप्रमाणे जमीन आणि पाण्यात राहून शांततेच आयुष्य व्यतीत करतं त्याचप्रमाणं भक्तांनिही परिस्थिती कोणतीही असो, तिच्याशी एकरुप होण्याची सवय अंगी बाणवावी ज्यातून तुम्हाला दीर्घायुष्याचा मार्ग गवसेल असा सुरेख बोधही कासवाच्या मंदिराबाहेर अस्तित्वातून मिळत असतो. त्यामुळं इथून पुढे जेव्हाजेव्हा मंदिराबाहेर कासव दिसेल त्याच्यापुढे नतमस्तक व्हाच, सोबतच त्या कासवाचं तिथे असण्यामागतचं कारण कोणी विचारल्यास त्यांनाही सांगा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News: नाशिकरोड पोलिसांची चाळीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई

0
नाशिकरोड | प्रतिनिधीनाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला असून सुमारे ४० रिक्षा चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त...