Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? उच्च न्यायालयाने...

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले

मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दिशा सालियन मृत्यूप्रकरणही समोर आले होते. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेत व मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने आवाज उठवत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे दिशाच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत यात आदित्य ठाकरेंचा कुठलाही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहेत. मात्र, आता याप्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना २ आठवड्यांची मुदत देत म्हणणे सादर करण्याचे सूचवले आहे. हायकोर्टाने
आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? असे म्हणत याचिकाकर्त्यांचे चांगलेच कान उपटले. एवढेच नाहीतर, तपास यंत्रणा काम करत असताना तुम्हाला आरोप करण्याची गरज काय? अशा शब्दांत ही फटकारले.

सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी जनहित याचिका दाखल केली होती. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. ८ जून २०२० रोजीचे दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे, कारण त्या रात्री हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

- Advertisement -

तसेच १३ व १४ जून २०२० रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारे सीसीटिव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची याचिकेतून मागणी केली होती. आज या याचिकेवर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी,आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? या मुद्द्यावर दोन आठवड्यात गुणवत्ता आधारावर पटवून द्या, असे स्पष्ट म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

या सुनावणी वेळी आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पाचबोला यांनी देखी जोरदार युक्तिवाद केला. तर याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांनीही जोरदार हरकत घेतली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे यांनी हस्तक्षेप करत ‘अनेक तपास एजन्सी तपास करत आहेत. मग, तुम्हाला हे आरोप का करावेसे वाटतात? असा खडासवाल कोर्टाचने याचिकाकर्त्यांना केला. दरम्यान, याप्रकरणी न्यायायलयात सुनावणी झाला असता उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यात आदित्य ठाकरेंच्या चौकशीबाबत पटवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...