Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात महायुतीचा पराभव का झाला? फडणवीसांनी थेट कारणेच सांगितली

राज्यात महायुतीचा पराभव का झाला? फडणवीसांनी थेट कारणेच सांगितली

मुंबई | Mumbai

काल देशातील लोकसभेच्या (Loksabha) ५४३ जागांचा निकाल जाहीर झाला. यात महाराष्ट्रातून (Maharashtra) महायुतीला १७ जागा मिळाल्या. त्यामध्ये भाजपला ०९, शिंदेंच्या शिवसेनेला ०७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे राज्यातून ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. यानंतर आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मला मोकळ करावं,अशी विनंती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली. तसेच फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाची कारणेही सांगितली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने भाजपला (BJP) नाकारलेले नाही, तर समसमान मते पडली आहेत. राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. तर संविधान बदलणार या विरोधकांच्या अपप्रचारचा आम्हाला फटका बसला. तसेच कांदा (Onion) प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचाही भाजपला फटका सहन करावा लागला. तर काही ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचा देखील प्रश्न होता. याशिवाय संविधान बदलणार, ही सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात कमी पडल्याचे फडणवीसांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील मतमोजणीनंतर महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) ४३.९१ टक्के तर महायुतीला ४३.६० टक्के मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख तर महायुतीला २ कोटी ४८ लाख मते मिळाली. आमच्यापेक्षा आघाडीला केवळ दोन लाख मते जास्त मिळाली. मात्र त्यांच्या त्यामुळे जागा वाढल्या असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुंबईत महाविकास आघाडीला ४ व महायुतीला २ जागा मिळाल्या असून महायुतीला २४ लाख तर माविआला २६ लाख मते मिळाली आहेत. राज्यात आठ जागा केवळ ४ टक्के पेक्षा कमी मताने आम्ही हरलो आहोत, ही निवडणूक घासून झाली. त्याचा फटका मात्र महायुतीला बसला असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वाढत्या वयानुसार निरोगी राहणासाठी काय करावे ?

0
वाढत्या वयाबरोबर अनेक समस्या येतात. योगासनामुळे या समस्या दूर होऊ शकतात. माणसाचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याच्या शरीरात वेगवेगळे बदल येऊ लागतात ....