पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील तिनखडी येथील दशरथ माधव खेडकर (वय 55) यांच्यावर पत्नीने नातेवाईकांच्या मदतीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दशरथ खेडकर हे भिलवडे शिवारात त्यांच्या शेतातील घरामध्ये असताना 26 एप्रिलला रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत दशरथ खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सुरेखा दशरथ खेडकर, कौशला बाळासाहेब आंधळे, बाळासाहेब बबन आंधळे, रमेश बाळासाहेब आंधळे, राजेंद्र मुरलीधर मिसाळ, युवराज राजेंद्र मिसाळ, आणि अंकुश त्रिंबक महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले, पत्नी सुरेखा खेडकर ही काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. परंतु 26 एप्रिलला रात्रीच्या सुमारास ती आपल्या नातेवाईकांसह सासरी पती दशरथ खेडकर यांच्या घरात आली. यावेळी कौशला आंधळे हिने लोखंडी गजाने दशरथ खेडकर डोक्यात मारहाण केली. त्यानंतर इतर नातेवाईकांनी मिळून घरात घुसून सोन्याची दागदागिने घेतले. एलईडी टीव्हीची तोडफोड केली, तसेच काही घरगुती साहित्य जाळून टाकले. अधिक तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.