Tuesday, April 29, 2025
HomeनगरCrime News : प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा, परप्रांतीय...

Crime News : प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा, परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने पतीचा खून… नेमका कसा रचला कट?

पारनेर । तालुका प्रतिनिधी

निघोज ते पाबळ रस्त्यावर १३ एप्रिल रोजी झालेल्या अपघाताच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात नसून बाबाजी शिवाजी गायके यांचा खूनच झाला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, त्याच्या पत्नीनेच परप्रांतीय प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

या प्रकरणात पारनेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत, मयताची पत्नी सुप्रिया बाबाजी गायके (वय २७, रा. निघोज) आणि तिचा प्रियकर जनकभाई भुपतभाई भिडभिडीया (रा. गुजरात) यांना अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सपोनि नितीन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रणजित मारग, पोना गहिनीनाथ यादव, पोकॉ गोर्वधन जेवरे यांनी सात दिवस गुजरातमध्ये ठाण मांडून २४ एप्रिल रोजी आरोपी जनकभाईला अटक केली.

सुप्रिया गायके हिला १५ एप्रिल रोजीच अटक करण्यात आली होती. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात स्पष्ट झाले की, सुप्रिया आणि जनकभाई यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध होते. पती बाबाजी त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याला हटवण्याचा कट रचण्यात आला. १३ एप्रिल रोजी बाबाजी याचा राहत्या घरी डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्यानंतर त्याचे प्रेत मोटारसायकलसह निघोज-पाबळ रस्त्यावर टाकून अपघाताचा बनाव करण्यात आला.

१३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पोलिसांना निघोज-पाबळ रस्त्यावर एक अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली होती. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदन अहवालात बाबाजीच्या डोक्यावर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

पोलिस उपअधीक्षक संपत भोसले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या तपासामुळे एक बनावट अपघाताचे रूप दिलेला निर्घृण खून उघड झाला असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना गजाआड करून समाजात एक प्रकारचा इशारा दिला आहे. तपास अजून सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटला? ‘महाराष्ट्र दिन’...

0
मुंबई | Mumbai महायुती सरकारला (Mahayuti Government) राज्यात सत्तेत येऊन शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. परंतु, नाशिक आणि रायगडच्या (Nashik and Raigad) पालकमंत्रीपदाचा तिढा काही...