Sunday, May 26, 2024
Homeनाशिकचारित्र्याच्या संशयावरून मद्यपी पतीकडून पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून मद्यपी पतीकडून पत्नीची हत्या

पेठ | Peth

तालुक्यातील धोंडमाळ (Dhondmal) येथे पत्नीवर चारित्र्याचा संशय (character Suspicion) घेत तसेच पिण्यासाठी आणलेली दारू (Alcohol) पिण्यास पत्नीने मज्जाव केल्याने पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, काल सगळीकडे बैलपोळ्याच्या (Bailpola) सणाची धामधुम सुरु असतांना पती-पत्नीत दारू पिण्याच्या कारणावरून व चारित्र्याचा संशयावरून कुरबुर सुरु असतांना पतीने कुऱ्हाडीच्या दांड्याचा फटका डोक्यात मारल्याने कुसुम हिरामण गांगोडे (Kusum Hiraman Gangode)(वय-४२) ही महिला जागीच मृत्युमुखी पडली.

तसेच त्यानंतर मयत महिलेचा भाऊ हिरामण लोखंडे (Hiraman Lokhande) (रा. कसोली ता. त्र्यंबकेश्वर) यांच्या फिर्यादीवरुन पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) पती हिरामण गांगोडे याच्याविरुद्ध भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोउनि कपिले करत आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या