Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमपत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन डोक्यात घातला दगड

पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन डोक्यात घातला दगड

गंभीर जखमी महिलेवर पुणे येथे उपचार सुरु || तीन जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

चारित्र्यावर संशय घेऊन पती-पत्नीमध्ये वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात दि. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. मंदा नारायण चव्हाण असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घातला. त्यावेळी पती पत्नी मधील वाद अगदीच विकोपाला गेला. तेव्हा आरोपी नारायण याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला. नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात मारला. त्यानंतर आरोपी घराला बाहेरुन कडी लावून पसार झाला.

- Advertisement -

जखमी महिलेचा भाऊ भगवान जाधव याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, माझी बहिण मंदा हिचे 14 वर्षापूर्वी नारायण चव्हाण याच्याशी लग्न झाले असून ते राहुरी तालुक्यातील मोमिन आखाडा येथे राहत आहे. नारायण हा सेंट्रींग चे काम करीत असून तो नेहमी माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दारू पिऊन मारहाण करीत असल्याचे माझी बहिण मला नेहमी फोनवर सांगत असत. माझी बहिण दिवाळी सणाला पुणे येथे माझ्याकडे आली असताना नारायण तिला नेण्यासाठी दोन वेळा आला होता. मात्र, माझी बहिण मंदा त्याच्याबरोबर गेली नाही. त्यानंतर नारायण हा त्याच्या मुलाला घेऊन मोमिन आखाडा येथे आला.

मंदा पुणे येथे असताना तिची सासू रुख्मिणी चव्हाण व भाया हरिभाऊ चव्हाण हेे वारंवार फोन करून त्यांना माझ्या बहिणीच्या जीवितास धोका असल्याचे माहित असूनही ‘तू नांदण्यासाठी आली नाही तर, तुला पाहून घेऊ’ अशी धमकी देत होते. त्यानंतर दि. 24 नोव्हेंबर रोजी मंदा ही मोमिन आखाडा येथे नांदवयास गेली. तसेच दि. 25 रोजी मी पुण्यात असताना माझ्या भाचीने घडलेली सर्व घटनेबाबत मला फोनवरून सांगीतले, आम्ही सायंकाळी 5 वाजणेच्या सुमारास शाळेतून घरी आलो असता घराला बाहेरून कडी लावलेली होती. आम्ही दार उघडून घरात गेलो असता आईला मारहाण झालेली असून डोक्यातून रक्त येत आहे. असे सांगितले.

मी शेजारच्या लोकांना बोलवून ताबडतोब दवाखान्यात नेण्याचे मी भाचीला फोनवरून सांगीतले. त्यानंतर शेजार्‍यांनी मंदा हिस प्रथम राहुरी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, ती गंभीर जखमी असल्याने तिला नगर येथील जिल्हा रूग्णालयात व तेथून पुणे येथील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटने बाबत ज भगवान दादाराव जाधव, रा. वाघोली, पुणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण, हरीभाऊ बाजीराव चव्हाण, रुख्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर गु.र.नं. 1220 भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), 115 (2), 118 (2), 351 (2), 351 (3) प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, गणेश सानप, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतिष कुर्‍हाडे, सचिन ताजणे, सचिन ठोंबरे, भगवान थोरात आदी पोलिस पथकाने काल दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून, आरोपी हरीभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुख्मिणी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतले. मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ. असे म्हणत प्रचंड आक्रोश केला.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...