Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यावन्यजिवांच्या अवयवांची तस्करी, एकास अटक

वन्यजिवांच्या अवयवांची तस्करी, एकास अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटी परिसरात वन्यजिवांच्या (wildlife) अवयवांची विक्री करणाऱ्या संशयितास वनविभागाच्या (Forest Department) पथकाने सापळा रचत अटक केली आहे. 

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक व्यक्ती हा पंचवटी परिसरात इंद्रजाल समुद्र प्राणी, वन्यजीवांची शिंगे, वन्यप्राण्याचे नखे अवैधरित्या (Illegally) विक्री करत होता, या माहितीच्या आधारे वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापाला रचला आणि संबंधित संशयिताला ताब्यात घेतले.

 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या सापळ्यात संशयित धनेश टेकम याला ताब्यात घेतले असून. त्याच्याकडे असणाऱ्या वन्यजीवांची अवयव जप्त करण्यात आली. यानुसार त्याच्यावर वन्यजीव अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आला असून पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या