Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभेची निवडणूक लढविणार आणि जिंकणारच - दिनकर पाटील यांची निर्धार मेळाव्यात घोषणा

विधानसभेची निवडणूक लढविणार आणि जिंकणारच – दिनकर पाटील यांची निर्धार मेळाव्यात घोषणा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

भाजपाने अकरा वर्षात सातत्याने आश्वासनांवरच बोळवण केलेली असून, प्रत्येकवेळी पक्षाने डावलले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री करतो, अथवा पंतप्रधान करतो असा जरी शब्द दिला तरी माघार घेणार नसल्याचे निर्धार दिनकर पाटील यांनी व्यक्त केला. आता यंदाची विधानसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला.

दिनकर पाटील यांनी मंगळवारी(दि.२२)निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर काकडे महाराज, फारुख पठाण, फिरोज पठाण, अरुण नागरे, जितेंद्र येवले, वालेराज महाराज ,विष्णु धिवरे, नीलेश भंदूरे, शैलेश शेलार, किशोर घाटे , वर्षा भालेराव, रवी धिवरे, मधुकर खांडबहाले, विठ्ठल अहिरे, लता पाटील अमोल पाटील उपस्थित होते.

दिनकर पाटील म्हणाले, पक्षाच्या आदेशाने तीन वर्ष खासदारकी साठी तयारी केली. लोकसभा मतदार संघातील ७०० गांवात चार चार वेळा दौरे केले. तरी देखील पक्षाचा आदेश मानला. त्यावेळी चंद्रकांत बावनकुळे म्हणाले विधानसभेची विधानसभेची तयारी करा असे सांगितले होते. त्यानुसार मी तयारी केली.धार्मिक कार्यक्रमे घेतली.विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली. तरी देखील पक्षाने उमेदवारी नाकारली हा आपल्यावर अन्याय आहे आ.सीमा हिरे यांनी सभा मंडप बांधणे आणि उद्यानात खेळण्या बसण्या पलीकडे काही काम केले नाही. मला मतदार संघात आयटी पार्क, उद्योग आणायचे आहेत म्हणून मला आमदार व्हायच असे ही दिनकर पाटील म्हणाले.

भाजपाने अजून विचार करावा आणि नाशिक पाश्चिम विधानसभा मतदार संघाचा एबी फॉर्म मला द्यावा असे आवाहन ही दिनकर पाटील यांनी केले.आ.सीमा हिरेंची सकाळीच निवासस्थानी येऊन भेट घेतल्याची माहिती ही पाटील यांनी निर्धार मेळाव्यात दिली. मात्र आ.सीमा हिरे यांना आपण सांगितले की माझे मतदार जे म्हणतील तेच निर्णय घेण्यात येईल.

या निर्धार मेळाव्यात उपस्थितांना त्यांनी लढायचे काय असा सवाल उपस्थित केला असताना सवर्रांनी हात उंचावत साथ देर्‍याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी दिनकर पाटील यांनी माझे मतदार मला निवडणूक लढण्यास सांगत आहेत म्हणून मी निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार दिनकर पाटील यांनी शेवटी स्पष्ट केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...