Friday, April 25, 2025
Homeजळगावव्यापार वृध्दिसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार-किशोर पाटील

व्यापार वृध्दिसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करणार-किशोर पाटील

पाचोरा । प्रतिनिधी

पाचोरा-भडगाव मतदारसंघात व्यापारी बांधवांच्या उद्योग वाढीसाठी मूलभूत सुविधांसोबतच भयमुक्त वातावरणामुळे व्यापार वाढीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झाली असून आपण पाचोरा शहरात व्यापारी बांधवांच्या मागणीप्रमाणे भव्य असे सर्व सुविधा युक्त व्यापारी भवन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्माण करू शकलो याचे आपल्याला मनस्वी समाधान असल्याचे भावना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलून दाखवली.

- Advertisement -

पाचोरा शहरात जैनपाठ शाळेत रविवारी संध्याकाळी सहा वाजता झालेल्या व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक गांधीनगर महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, कांतीलाल जैन, मुन्ना राजपूत, नंदू सोमवंशी,संजय गोहिल, शरद पाटील, राम केसवाणी, विनय सेठ, बापू सोनार आदी उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, व्यापारी आणि माझे नेहमी घनिष्ठ संबध राहीले आहे. व्यापार वृध्दिसाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीलो आहे.

व्यापार्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. पाचोरा शहरात व्यापारी भवनाची निर्मिती करून व्यापार्‍यांना दिलेला शब्द पुर्ण केला आहे. आगामी काळातही व्यापार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली. आपण पाचोरा शहरात व्यापारी संकुल उभे करून छोट्या व्यावसायिकांनाही चालना देण्याचे काम केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...