अमळनेर । प्रतिनिधी
परिसरात उद्योग व रोजगार वाढीसाठी सरकारी एमआयडीसी उभारण्याचे आपले स्वप्न असून येणार्या काळात 100 जागा शोधून ते पूर्ण करणार आणि शहरात एज्युकेशनल हब निर्माण करणार अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी संकल्प सभेत दिली. तर काम करणारा माणूस म्हणून अनिल दादांना सपोर्ट करा असे आवाहन खा.स्मिताताई वाघ यांनी केले.
शहरातील व्यापारी, व्यावसायिक बांधव, डॉक्टर, वकील आणि इंजिनिअर, सी ए, शिक्षक आणि इतर बुद्धीजीवी मंडळींच्या उपस्थितीत बन्सीलाल पॅलेस येथे संकल्प सभा पार पडली यावेळी अनिल पाटील म्हणाले की काम करणार्याची कदर जनता नक्की करते, या भूमीतील सर्वांशी माझे पारिवारिक संबंध आहे.
30 वर्षांपासून आपले स्नेह आहे असे असताना कुणीतरी येत आणि आपलं दिशाभूल करतो हे कुठेतरी थांबविले पाहिजे. याठिकाणी मिल चालू करण्यासाठी काहींनी आश्वासन दिले असताना त्या चोरल्या गेल्या उद्या धरणही चोरीला जाईल. साहेबराव दादांनी चांगले काम पालिकेत केले असताना, त्यांनी आपल्या नगरसेवकांना घरी पाठविण्याचे कृत्य केले होते, मी आणि स्मिताताई आश्वासन देतो की जीवात जीव असेल तोपर्यंत सर्वांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, विकासाचे पर्व आपल्या डोळ्यासमोर दिसतेय, विप्रोला देखील चालना मिळावी म्हणून शहरात चार डी पी रस्ते टाकून बंगाली फाईल परिसरातून पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे. मी ही क्रिकेटचा शौकीन असून मी बॅटसमन नसलो तरी चांगला बॉलर आहे, अनेकांच्या व्हिकेट मी घेतल्या आहे, कुठे कशी गुगली टाकावी हे मला समजते असे मार्मिकपणे सांगून 20 तारखेला घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. खा स्मिताताई वाघे म्हणाल्या की, आपण व्हिजन असणारा माणूस निवडून दिला पाहिजे, अनिल दादांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. सी ए नीरज अग्रवाल यांनी दादाना मताधिक्य द्यावे असे आवाहन केले. अॅड.राजेंद्र अग्रवाल यांनी पुढील पाच वर्षात अमळनेर मेट्रो सिटी सारखे राहील, धरण पूर्ण झाल्यावर कायापालट होईल अशी ग्वाही दिली. आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रशांत शिंदे यांनी आपल्या भूमीचे नाव बिकानेर न होता पावन भूमी अमळनेर असे करायचे आहे, म्हणून अनिल दादांना त्याला निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बजरंगशेठ अग्रवाल, हरी भिका वाणी, विनोद भैया पाटील, सुभाष चौधरी, हिंदुजा शेठ, डॉ.प्रशांत शिंदे, मुक्तर खाटीक, नीरज अग्रवाल, डॉ.विशाल बडगुजर, अजय हिंदुजा, दिनेश कोठारी, पंकज साळी आदी मान्यवर व्यासपीठ वर उपस्थित होते.